Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण जनजागृती साठी भव्य "ई बाईक" रॅलीचे आयोजन

 सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण जनजागृती साठी भव्य "ई बाईक" रॅलीचे आयोजन

हे दशक "ई वाहनांच"असेल:मुख्याधिकारी कैलास केंद्रे


सांगोला (कटूसत्य वृत्त):- पर्यावरण समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जल,पृथ्वी,आकाश,अग्नी,वायू या पंच तत्वावर आधारित माझी वसुंधरा 2.0 अभियानात सांगोला नगरपरिषदे सहभागी झाली आहे.या अभियाना अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदे मार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणून सांगोला शहरातील नागरिकांमध्ये वीजेवर चालणाऱ्या वाहनांबाबत जनजागृती व्हावी यासाठी नगरपरिषदेमार्फत आयोजित ई बाईक रॅली ला मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

माझी वसुंधरा 2.0 अभियानाच्या *'वायू'* या घटाका अंतर्गत पर्यावरण रक्षण,हवा प्रदूषण कमी करणे,इंधनाची बचत याबाबत जनजागृती तसेच नागरिकांमध्ये चांगल्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी या  ई बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीला शहरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीची सुरवात नगरपरिषदेचे लेखापरीक्षक विजय कन्हेरे यांच्या हस्ते ध्वज फडकावून करण्यात आली. सदर रॅलीची सुरवात सांगोला नगरपरिषद येथून महात्मा फुले चौक ते भोपळे रोड, कडलास नाका, आंबेडकर उद्यान, कचेरी रोड मार्गे नगरपरिषद येथे रॅलीचे समारोप करण्यात आले.  यानंतर उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली.

या ई बाईक रॅलीच्या आयोजनात शहरातील SM Motors संगोला यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकुमार कन्हेरे, लेखापरीक्षक यांनी विशेष प्रयत्न केले. या रॅली च्या वेळी स्वप्नील हाके,योगेश गंगाधरे,अमित कोरे,शिवाजी सांगळे,नयन लोखंडे,शरद चव्हाण व इतर नगरपरिषद कर्मचारी हजर होते.


हवेचे प्रदूषण रोखणे,इंधना बचत यासाठी नागरिकांनी आता पेट्रोल,डिझेल वाहनांऐवजी वीजेवर चालणाऱ्या '₹" ई बायक" कडे वळून जास्तीस जास्त ई नागरिकांनी ई वाहने खरेदी करावीत व पर्यावरण संवर्धनाचे साक्षीदार व्हावे !

कैलास केंद्रे

मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद

Reactions

Post a Comment

0 Comments