Hot Posts

6/recent/ticker-posts

रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते खैराव येथे 55 लाख निधीतून होणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन

 रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते खैराव येथे 55 लाख निधीतून होणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन


माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्याच्या पूर्व भागातील जलसिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मानेगाव उपसासिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मंजुरी घेतली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून ही योजना कार्यान्वित झाल्यावर या भागातील सहा गावांतील हजारों एकर क्षेत्र बागायत होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.


ते खैराव ता.माढा येथे 55 लाख निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी सरपंच सुभाष नागटिळक होते.


पुढे बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की, या भागातील सर्व सभासद शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप केले जाणार असून याकरिता या परिसरात वाहने व ऊस तोडणी करणा-या टोळ्या वाढवून देण्याचे नियोजन सुरू आहे त्यामुळे कोणतीही अडचण येणार नसल्याने कसलीही काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते आमदार बबनराव शिंदे यांच्या 7 लाख फंडातून उभारण्यात येणारा सभामंडप,तीन लाख निधीतून खैराव शिवरस्ता,25-15 मधून मंजूर 10 लाख निधीतून लक्ष्मी वाट व नागनाथ मंदिर रस्ता,जिल्हा परिषदेच्या 9.86 लाख निधीतून शाळा खोली व शौचालय बांधणे, 3054 हेडमधून मंजूर 10 लाख निधीतून मानेगाव नागनाथ मंदिर रस्ता,जनसुविधा योजनेतून मंजूर 3 लाख निधीतून स्मशानभूमी रस्ता, दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर 5 लाख निधीतून पेविंग ब्लॉक बसविणे व सिमेंट काँक्रीटीकरण करणे,15 व्या वित्त आयोगातून मंजूर 4.50 लाख निधीतून गटार बांधणे, 3 लाख रुपये निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राभोवती वॉल कंपाऊंड बांधणे या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.


प्रास्ताविक ज्ञानेश्वर पाटील यांनी केले, सूत्रसंचालन महेश नागटिळक यांनी केले.आभार सुहास नागटिळक यांनी मानले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख,विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक निळकंठ देशमुख,संदीप पाटील,उल्हास राऊत, उपळाई खुर्दचे सरपंच संदीप पाटील, उपसरपंच पंडित पाटील,सरपंच रमेश भोईटे,तानाजी लांडगे, वैजिनाथ व्हळगळ,रामेश्वर नागटिळक,शरद नागटिळक,प्रताप नागटिळक,दिनकर नागटिळक,बाळासाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

  

Reactions

Post a Comment

0 Comments