Ads

Ads Area

कटफळ मध्ये शेकापला हादरा-विद्यमान सरपंच कोळेकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

 कटफळ मध्ये शेकापला हादरा-विद्यमान सरपंच दादासाहेब कोळेकर                     यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश                          



             

    सांगोला (कटूसत्य वृत्त):- कटफळ ग्रामपंचायतीचे सरपंच दादासाहेब कोळेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा त्याग करून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.यामुळे कटफळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
          कटफळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दादासाहेब कोळेकर यांच्यासह संजय मोरे,दादा आटपाडकर,दादा हातेकर,विकास संस्थेचे माजी सदस्य बंडू नरळे आदी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त  करत शेतकरी कामगार पक्षाचा त्याग करून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.कटफळ येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमांमध्ये या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
          या कार्यक्रमास आमदार शहाजीबापू पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर,संजय मेटकरी, दादासाहेब लवटे,दिग्विजय पाटील,विजय पाटील, आचकदाणी चे उपसरपंच शिवाजी चव्हाण,लक्ष्‍मण भोसले,महिम चे माजी सरपंच राजेंद्र मरगर,रवींद्र कदम,सुरेश कदम,शहाजी खरात,दत्तात्रय बंडगर, कटफळ चे उपसरपंच महादेव बंडगर,तानाजी वीरकर,अशोक माने यांच्यासह शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
          यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की,जातीयवादी राजकारणाने आपले जीवन उद्ध्वस्त होत आहे. दबावतंत्र व जातीयवादाच्या खुळचट कल्पना याचा त्याग करून प्रगती कडे जाणाऱ्या विकासाचे राजकारण तरुणांनी करावे. कोणत्याही निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय विचारांची घुसळण होणे आवश्यक आहे.मात्र असे न होता निव्वळ जातीयवादी राजकारणा मुळे शत्रुत्व वाढवणे ही लोकशाहीची हत्या आहे. कटफळ परिसराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.कटफळ सह या भागातील वंचित गावांना पाणी मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही,असेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगितले.प्रा.संतोष खरात यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.कार्यक्रमास कटफळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close