Hot Posts

6/recent/ticker-posts

चेतनसिंह केदार-सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त 173 आटा चक्कीचे वाटप- अवधूत केदार

 चेतनसिंह केदार-सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त 173 आटा चक्कीचे वाटप- अवधूत केदार



      

सांगोला (कटूसत्य वृत्त):- भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अवधूत केदार यांच्या वतीने कुटुंबासाठी उपयुक्त असणारी व सहज वापरता येणाऱ्या 173 फोरजी आटाचक्कीचे वाटप करण्यात आले.भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अवधूत केदार-सावंत यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी 52 टक्के सवलतीच्या दरात फोर जी आटा चक्की उपलब्ध करून दिली होती. महाराष्ट्रातील नंबर एकचा ब्रँड असणारी स्पीड इंटरनॅशनल आटा चक्की दोन मॉडेलमध्ये उपलब्ध असून रेग्युलर मॉडेल फोर जी पॅटर्न 20 हजार 850 ऐवजी 9 हजार 900 रुपये मध्ये व टू इन वन फोर जी मॉडेल 26 हजार 900 ऐवजी 12 हजार 900 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली होती. 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान हॉटेल जोतिर्लिंग, वाढेगांव नाका, सांगोला या ठिकाणी सुमारे 173 आटा चक्कीचे वाटप करण्यात आले. हॉटेल गोल्डन लिफचे मालक अवधूत केदार यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य लोकांना 52 टक्के सवलतीच्या दरात सुमारे 173 आटा चक्कीचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments