Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज मध्ये प्लास्टिक पिशव्या बंदीला उदंड प्रतिसाद

 अकलूज मध्ये प्लास्टिक पिशव्या बंदीला उदंड प्रतिसाद                           

अकलूज (कटूसत्य वृत्त):-अकलूज मध्ये प्लास्टिक पिशव्या बंदीला व्यापाऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याने अकलूज नगर परिषदेचे कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांचे आभार मानले. शासनाकडून संपूर्ण राज्यामध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली होती. सदर प्रतिबंध अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक 30/ 9/ 21 पासून शासनाने 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर, साठवणुकीवर, हाताळणीवर आणि वाहतुकीवरही बंदी घातलेली आहे. उपरोक्त शासन निर्णयाचे अवलोकन केले असता ,नवनिर्मित अकलूज नगर परिषदेमध्ये ही सदर प्लास्टिक बंदीची मोहीम कठोरपणे राबविण्यात येत आहे. त्यामुळे 30 सप्टेंबर 2019 पासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर, हाताळणी व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यालाच प्रतिसाद म्हणून नागरिकांनी स्वच्छ - सुंदर आणि पर्यावरण पूरक अकलूज शहर बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अकलूज नगर परिषद हद्दीतील व्यापारी, गाळेधारक ,किराणा, भाजी मंडई व फळ विक्रेते यांनी आपले दुकान,हातगाडे यावर प्लास्टिक पिशव्यांचे विक्री , वापर करणे बंद केले आहे .म्हणून अकलुज नगर परिषद मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरीक्षक बाळासाहेब वाईकर व करसंकलन विभाग कर्मचारी यांनी  त्यांचे गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करण्यात आले.


Reactions

Post a Comment

0 Comments