Hot Posts

6/recent/ticker-posts

भैरवनाथ शुगर चालू सीझनमध्ये गळीतास येणाऱ्या उसास 2400 रुपये दर देणार प्रा. शिवाजी सावंत

 भैरवनाथ शुगर चालू सीझनमध्ये गळीतास येणाऱ्या उसास 2400 रुपये दर देणार प्रा. शिवाजी सावंत

                                                                    

भैरवनाथ शुगरचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात पार पडला


माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. आलेगाव युनिटचा सीझन 2021- 22 चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. प्रारंभी अरुण गाडे व सौ शोभा गाडे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली यावेळी बोलताना प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले की दिवाळीसाठी शंभर रुपयांचा हप्ता देणार असून चालू सीझनमध्ये गळीतास येणाऱ्या उसास 2400 रुपये दर देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रा. सुहास पाटील, माजी सभापती शिवाजी कांबळे, शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जि.प.चे उपाध्यक्ष धनंजय सावंत वाशी युनिटचे कार्यकारी संचालक केशव सावंत ,आलेगाव युनिटचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत, संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, सुहास पाटील, पोपट अनपट, योगेश बोबडे, मधुकर देशमुख विजय पवार,आलेगावचे सरपंच पंढरीनाथ चंदनकर,विनोद पाटील, तानाजी गाडे,विकास गाडे जनरल मॅनेजर सुरेश पाटील,प्रोसेस जनरल मॅनेजर पोपट क्षिरसागर यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पाटील यांनी व आभार असि.जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ व विजय खटके यांनी मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments