लोकशाही शासन व्यवस्था बळकट करण्यासाठी मतदान पवित्र कार्य
नगरसेवक मुस्ताक शेख यांचे प्रतिपादन मोहोळमध्ये नव मतदार नोंदणी अभियान सुरू
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-लोकशाही शासन व्यवस्था बळकट करण्यासाठी मतदान करणे हे एक पवित्र कर्तव्य आहे. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळेच या लोकशाही शासन व्यवस्थेत आपण आपल्या मूलभूत सोयीसुविधा शासनस्तरावरून चांगल्या प्रकारे उपलब्ध करून घेऊ शकतो. जागृत मतदार हा देशाची सर्वात मोठी लोकशाही जपणारी संपत्ती आहे असे मत राष्ट्रवादीचे नगरसेवक मुस्ताक अहमद शेख यांनी व्यक्त केले. 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची मतदार नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत आणि सुलभ प्रक्रियेने व्हावी. यासाठी मोहोळ येथील कै. शहाजीराव पाटील सभागृहामध्ये माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली नवमतदार नोंदणी, त्याचबरोबर मतदार नोंदणी मधील रहिवासी ठिकाणातील बदलाची नोंदणी अभियान उपक्रम मोहोळ राष्ट्रवादीच्या वतीने राबवण्यात आला. या नोंदणी अभियानाचे उदघाटन झाल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेख बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष प्रमोदबापु डोके, नगरसेवक मुस्ताकभाई शेख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष कुंदन धोत्रे, युवक अध्यक्ष अझरोद्दीन शेख, गणेश धोटे, हुजेेफ शेख हे उपस्थितीत होते. या अभियानासाठी बालाजी शिंगाडे यांचे सहकार्य लाभत आहे. हे अभियान आज आणि उद्या दिवसभर चालणार आहे. शहरातील जास्तीत जास्त नवीन मतदारानी त्याचबरोबर मतदान केंद्र अथवा रहिवाशाचे ठिकाणातील बदलाची नव्याने नोंद करण्यासाठी नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन उपनगराध्यक्ष प्रमोदबापू डोके यांनी केले आहे.
0 Comments