अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने नऊ गरजु मातांना नऊ रंगाच्या साड्यांचे वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने नऊ गरजु मातांना शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त डाॅ.सोनाली घोंगडे यांच्या हस्ते साड्यांचे वाटप. करण्यात आले. शारदीय नवरात्र महोत्सवात नऊ रंगाच्या साड्यांना महत्व असते पण आजच्या काळात ही अनेक मातांना नऊ रंगाच्या साड्या नेसायला मिळत नाहीत. अनेकांची परिस्थिती नाजूक असते याचा विचार करून नवरात्र निमित्त गेल्या पाच वर्षा पासून नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या नऊ गरिब मातांना वाटप करण्यात येते. जेणे करून त्या मातांना ही सर्वां सोबत सणावाराला नवीन साडी नेसुन सण साजरा करण्यात यावा. हे सामाजिक भान ठेवत कार्यक्रम साजरा करण्यात येते अशी माहिती अपरिचित सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयुर गवते यांनी दिली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डाॅ.सोनाली घोंगडे म्हणाल्या की, भारत हा उत्सव प्रिय देश आहे व सर्व सणांना अनन्य साधारण महत्व आहे. त्या पैकीच दसरा हा सण या दिवसात महिलांना विशेष असे हा सणाचे आकर्षण असते. सर्व भारतातील महिला भक्ति भावाने देवीची आराधना करतात ह्या दिवसांमध्ये नऊ रंगाच्या साड्या परिधान केल्या जातात. गरजू महिलांना ही सण साजरे करता यावे यासाठी अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने वर्ष भर अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. तर आज नवरात्र निमित्त नऊ रंगाच्या साड्या गरजु मातांना माझ्या हस्ते देण्यात आल्या हा खुप प्रेरणादाई कार्यक्रम आहे. तरी सर्व सामाजिक संस्थांनी अशा प्रकारचे कार्यक्रम सामाजिक भान ठेवत साजरे करावे असे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. सोनाली घोंगडे व ममता बोलाबत्ती,महादेवी माणवे, यशोदाबाई सुरवसे, पदमिनी लकशेट्टि ,सुमादेवी हिरेमठ,सावित्रीबाई दुधनी,श्रीदेवी मुन्नुरेड्डि, पार्वती गवते,धानेश्वरी हिरेमठ, शकुंतला कुंभार,प्रमुख उपस्थिती होती तर मोठ्या प्रमाणावर परिसरातील माता भगिनि उपस्थित होत्या या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पा स्वामी, नरेश मुन्नुरेड्डी,विनोद कर्पेकर,अशोक खेडगिकर प्रशांत लकशेट्टि ,चंदु पागद ,सिद्धेश्वर विजापुरे व परिसरातील अनेक मंडळी उपस्थित होते.
0 Comments