महाराष्ट्र बंदला तडवळे गावातून प्रचंड प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 12, 2021

महाराष्ट्र बंदला तडवळे गावातून प्रचंड प्रतिसाद

 महाराष्ट्र बंदला तडवळे गावातून प्रचंड प्रतिसाद



कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे महाराष्ट्र बंदला चांगलच प्रतिसाद मिळाला आहे लखिमपुर येथील भाजपने केलेल्या नरसहाराच्या घोर कृत्याने महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता त्या बंदला तडवळे गावातून भरभरून प्रतिसाद मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कसबे तडवळे व कळंब या गावातून कडकडीत बंद पाळून गावातून भव्य रॅली काढून भाजप सरकारच्या क्रुर कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला. जगभराच्या पोशिंदा अन्नदाता शेतकरी असून त्याच्यावर भाजप सरकार वाईट वेळ आणीत आहे एकीकडे निसर्गाने चांगली साथ सोडली आहे तर दुसरीकडून भाजप सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे या कृत्याने शेतकरी चांगलाच पेटून उठला आहे गावातील दुकाने, एस पी शुगर पूर्णपणे बंद ठेवून निषेध केला कुठल्याही आघोरे कृत्य न करता गावातून श्री सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंद यशस्वी पार पडला. रॅली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटील प्रतिष्ठित व्यापारी राजाभाऊ लोंढे तंटामुक्ती अध्यक्ष सुनील वळेकर तडवळे गावचे सरपंच किरण आवटे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते,गावकरी,शेतकरी, कर्मचारी,महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages