प्रा.शिवाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार बालकांना खाऊ वाटप
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा शिवसेना समन्वयक व जयवंतराव सांवत प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भैरवनाथ शुगरचे चेअरमनप्रा.शिवाजीराव सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त कुर्डुवाडी शहर शिवसेनेच्या वतीने उम्मीद मेमोरिअल ट्रस्ट या संस्थेमधील अनाथ निराधार बालकांना खाऊ वाटप करण्यात आले. कुर्डुवाडी शिवसेना शहर प्रमुख समाधान दास,आरपीआय युवक आघाडी शहराध्यक्ष जितेंद्र गायकवाड,शिवसेना उपशहर प्रमुख आप्पासाहेब ढवळे,युवा सेनेचे समन्वयक राज ढेरे,यांचा प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख समाधान दास म्हणाले की हिंदू हृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अखंड प्रेरणेने ८०% समाजकारण २०% राजकारण या धोरणानुसार अंमलबजावणी करण्याच्या हेतूने अनाथ उपेक्षित निराधार बालकांसाठी घेण्यात आलेला हा उपक्रम प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त असून शिवसेना भविष्यात देखील अशाच सामाजिक हेतूने कार्यरत राहील अशी सदिच्छा यावेळी त्यांनी आवर्जून व्यक्त केली यावेळी दिगंबर तोरणे,महादेव गायकवाड,विशाल चौगुले,शेर खान,गणेश जाधव, राहुल बनसोडे,प्रणित गायकवाड,विकी चौधरी,बाबा आयवळे,बबलू खांडेकर,राजेश उबाळे,योगेश बाबर, मन्सूर शेख,अजय माने,प्रमोद बाबर,आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक राज ढेरे यांनी तर आभार शिवसेना उपशहर प्रमुख किशोर (आप्पा) ढवळे यांनी मानले.
0 Comments