वीज पडून मृत्यू झालेल्या कै. विठ्ठल ज्ञानू नरळे यांच्या वारसास नैसर्गिक आपत्ती मदतनिधीतून चार लाख रुपये धनादेशाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते वितरण
सांगोला (कटूसत्य वृत्त): जून महिन्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट होऊन सांगोला तालुक्यात मध्ये पाऊस झाला या पावसामध्ये मौजे तिप्पेहाळी ता सांगोला येथील राहिवासी कै विठ्ठल ज्ञानू नरळे वय ४० वर्षे हे दिनांक २६ ६ २०२१ रोजी सायं४.१० वा तिप्पेहाळी येथे घराचे पाठीमागे चार खोदत असताना अंगावर वीज पडून मयत झालेले आहेत त्यामुळे त्यांची वारस पत्नी श्रीमती कांताबाई विठ्ठल नरळे यांना नैसर्गिक आपत्ती मदतनिधी मधून प्राप्त झालेल्या निधीमधून रक्कम चार लाख रुपये शासकीय मदत निधीचा धनादेश आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते काल दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी तहसील कार्यालय सांगोला येथे वारसास देण्यात आला.
या वेळी मा नगराध्यक्ष रफिक नदाफ,तहसिलदार श्री अभिजीत पाटील, निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे आदी उपस्थित होते.
0 Comments