Hot Posts

6/recent/ticker-posts

धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा व दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

 धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा व दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

          सांगोला (कटूसत्य वृत्त): सन 2021-22 यावर्षी अध्यक्षपदी सौ. मिनाक्षी येडगे, उपाध्यक्षपदी सौ. दिपाली सरगर, सचिवपदी सौ. मिनाक्षी गडदे, खजिनदार पदी सौ. कल्पना माने, सल्लागार पदी अ‍ॅड. सौ. संजीवनी लवटे यांची निवड झाल्याबद्दल धनगर समाजसेवा महिला मंडळ सांगोला यांच्या वतीने दि. 30 ऑगस्ट रोजी धनगर गल्ली येथील समाजमंदिरामध्ये सत्कार सोहळा घेण्यात आला.

          सदर कार्यक्रमाची सुरूवात स्व.डॉ.आ. गणपतरावजी देशमुख (आबासाहेब) व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाची सुरूवात सांगोला नगरीच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्षा धनगर समाजसेवा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. राणीताई माने, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, ज्येष्ठ सदस्या आशा सलगर मॅडम, महानंदा मासाळ मॅडम, डॉ. प्रज्ञा लवटे मॅडम, महिला सूतगिरणीच्या व्हा. चेअरमन कल्पनाताई शिंगाडे, अध्यक्षा सौ. मिनाक्षी येडगे या सर्वांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.

          स्व. आ. गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांना धनगर समाजसेवा महिला मंडळाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून महिला सूतगिरणीच्या व्हा. चेअरमन कल्पनाताई शिंगाडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रवाहाच्या दिशेने जो पोहतो तो टिकत नाही, परंतू प्रवाहाच्या विरूध्द गतीने जातो तोच यशस्वी माणूस होतो. आपल्या डोळ्यासमोर सतत अहिल्यादेवींचे चरित्र ठेवा, व त्यानुसार वाटचाल करा, असे बोलताना कल्पनाताई शिंगाडे यांनी सांगितले.

          अध्यक्षस्थानावरून बोलताना नगराध्यक्षा सौ. राणीताई माने म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी मिळवलेले मार्क्स त्यांच्या कष्टाचे असतात, तसेच जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते.

          नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, कल्पनाताई शिंगाडे यां सर्वांच्या हस्ते नूतन पदाधिकार्‍यांच्या सत्कार करण्यात आला.

          आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त महानंदा मासाळ मॅडम यांचाही सत्कार धनगर समाजसेवा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आला. तसेच राजमाता नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्हा. चेअरमनपदी सौ. प्रियांका श्रीराम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला.

          प्रियांका रूपनर यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो तर सुनिता मेटकरी यांनी स्व. आ. गणपतराव देशमुख यांचा फोटो मंडळाला भेट म्हणून दिला.

          दहावी आणि बारावीमधील गुणवत विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळाच्या तीवेन करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र, पुष्प व स्व.आ. गणपतराव देशमुख यांच्या जीवनावरील एक पुस्तक भेट देण्यात आले.

          नूतन सदस्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी शांता हाके, रूपाली मदने, अर्चना लवटे, सुनिता आलदर, प्रियांका सरगर, सोनाली राऊत, शीला माने, अनिता जानकर, अश्विनी पुजारी, कारंडे मॅडम, अनिता मदने, ज्योती चोरमुले आदी महिला वर्ग उपस्थित होता.

Reactions

Post a Comment

0 Comments