रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे कार्य कौतुकास्पद--उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील
रोटरी क्लबच्या वतीने लक्ष्मीनगर शाळेस स्मार्ट टीव्ही भेट
सांगोला (जगन्नाथ साठे):- रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे कार्य कौतुकास्पद असून आतापर्यत केलेले कार्य महान आहे.गावातील सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सांगोलाची टीम प्रयत्न करत आहे. सांगोला शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची राज्यात दखल घेतली आहे.आज लक्ष्मीनगर येथील जि प शाळेला स्मार्ट टीव्ही भेट देवून शिक्षण क्षेत्रात ही आम्ही मदतीस तयार असल्याचे दाखवून दिले.तसेच विठ्ठल मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाबदल रोटरी क्लब ऑफ सांगोला टीमचे अभिनंदन करते, असे गौरवोद्गार उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी व्यक्त केले. लक्ष्मीनगर ता सांगोला येथे रोटरी क्लबच्या वतीने स्मार्ट टीव्ही भेट दिली यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक सुहास जगताप,रोटरी चे अध्यक्ष विजय म्हेत्रे,सचिव श्रीपती आदलिंगे,माजी नगराध्यक्ष मधुकर कांबळे,डॉ मच्छिंद्र सोनलकर, सरपंच धनाजी बाड, उपसरपंच स्वाती साठे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सुहास जगताप म्हणाले की लवकरच रोटरी क्लबच्या सहकार्यातून सांगोला शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे.पुढील काळात रोटरी क्लबने सामाजिक कार्यात आपली ओळख अशीच ठेवावी.आम्ही आपणांस सहकार्य करण्यास तयार आहे,असे अभिवचन देवून रोटरी ने शाळेस दिलेल्या स्मार्ट टीव्ही मुळे विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे महत्व समजेल.नक्कीच रोटरी क्लबच्या मदतीने शिक्षण क्षेत्रातील आदर्शवत कामाची पोहच त्यांना मिळेल,असा आशावाद व्यक्त केला.यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्मार्ट टीव्ही मुख्याध्यापक फाळके गुरुजी आणि सर्व शिक्षकांकडे भेट दिला.
तर रोटरी चे माजी अध्यक्ष ऍड विशाल बेले यांनी रोटरी क्लब करीत असलेल्या कामाची ओळख करून दिली. सामाजिक जाणिवेतून आज लक्ष्मीनगर येथे 11 वृक्षांचे वृक्षारोपण केले. तसेच स्मार्ट टीव्ही देण्याचा उद्देश सांगून स्मार्ट टीव्ही मुळे लक्ष्मीनगर येथील शाळेतील विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण घेतील. येणाऱ्या काळातही रोटरी क्लब ऑफ सांगोला विविध सामाजिक कार्य राबविण्यात अग्रेसर असेल अशी ग्वाही दिली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी सरपंच धनाजी नरळे, प्रगतशील बागायतदार यशवंत नरळे, पोलीस पाटील संघटनेचे नाना वाळेखिंडी बाळासाहेब शिंदे,ग्रा सदस्य राम दादा गोडसे,नितीन नरळे, दीपक बाड, दरिअप्पा खिलारे,माजी उपसरपंच भगवान साठे,पांडुरंग गोडसे,विश्वनाथ लोखंडे, दीपक बाड सर,मुख्याध्यापक फाळके गुरुजी, रोटरी सदस्य विशाल बेले, प्रविण मोहिते,नीलकंठ लिंगे,गवळी सर,डोंबे गुरुजी,संतोष गुळमिरे, ऍड सचिन पाटकुलकर,राजाराम गोडसे,इंजि हमीद शेख,आणि रोटरी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर हिप्परकर यांनी केले तर आभार उपसरपंच स्वाती साठे यांनी मानले.
0 Comments