कोळा गावच्या शिक्षणक्षेत्राशी झपके घराण्याच्या तीन पिढ्यांचा संबंध-प्रा.प्रबुद्धचंद्र झपके

कोळा विद्यामंदिर व ग्रामपंचायतीच्यावतीने प्रा.झपके सन्मानित
कोळा (कटूसत्य वृत्त):- कोळा गावातील शिक्षणक्षेत्राशी झपके तीन पिढ्यांचा संबंध राहिला असून आजोबा कै.विश्वनाथ एकनाथ झपके हे कोळ्याच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.वडील कै.चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके यांनी सन 1959 साली कोळा विद्यामंदिरची उभारणी करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा तत्वनिष्ठेने संस्था चालवली तसेच पुढील काळात संस्थाध्यक्ष म्हणून कार्य करताना आजतागायत आम्ही या पवित्र शैक्षणिक क्षेत्रात राजकारणविरहित कार्य करत असून यामध्ये कोळा ग्रामस्थांनी भरभरुन सहकार्य,प्रेम व सन्मान दिला.हाच जिव्हाळा यापुढील काळातदेखील जपला जाईल असे उद्गार त्यांनी सत्कारमुर्तींच्या मनोगतातून व्यक्त केले.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांना वि.गु.शिवदारे प्रतिष्ठान,सोलापूर यांच्यावतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल "जीवनगौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानिमित्त कोळा विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज तसेच कोळा विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल,कोळा तसेच कोळा ग्रामपंचायत,कोळा यांच्यावतीने सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
वडील कै.बापूसाहेब झपके यांच्यापासून चालत आलेली सामाजिक कार्याची धुरा पुढे नेत असताना आजवर विद्यामंदिर परिवार,लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रेम करणारे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने यशस्वी ठरणारे रक्तदान शिबिर,नेत्रचिकित्सा शिबिर यातून हजारो रुग्णांना मोफत मदत झाली असून 250 नेत्रशस्त्रक्रियासुद्धा पार पडल्या असल्याचे त्यांनी विषद केले.
विद्यामंदिरची गुणवत्ता सांगताना विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांचे अपरिमित कष्ट परिणामकारक ठरले असून त्यातूनच विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी लातूर पॅटर्नवर आधारीत सांगोला विद्यामंदिर येथे सुरू करण्यात आलेल्या NEET,JEE,CET अभ्यासवर्ग आणि 12 वी नंतरच्या पुढील करिअर संधी याविषयी प्रा.जालिंदर मिसाळ (सांगोला) व प्रा.सिद्धेश्वर चव्हाण (लातूर) यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वतीदेवीच्या प्रतिमापुजनाने झाली.
प्रास्ताविक प्राचार्य नारायण विसापुरे यांनी केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य सिताराम सरगर,ख.वि.संघाचे वि.मा.देशमुख सर,मारुती सरगर सर,उपसरपंच दगडू कोळेकर,ग्रामपंचायत सदस्य डाॅ.सादीक पटेल,शिवाजी हातेकर,नामदेव आलदर,उद्धव करांडे,उद्योजक श्रीमंत सरगर,पत्रकार जगदीश कुलकर्णी,लिंगाप्पा हातेकर सर,ज्येष्ठ नागरिक प्रभाकर वाले,प्रा.शिवलिंग स्वामी(लातूर),प्रा.गंगाधर घोंगडे,पर्यवेक्षक रफिक मणेरी यांच्यासह ग्रामस्थ,पालक,विद्यार्थी,शिक् षक व शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव कोठावळे सर आणि आभार मुख्याध्यापक विनोद देशमुख यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments