टेंभू योजनेच्या आवर्तनाच्या नियोजनाची बैठक आ. शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये संपन्न

पंढरपूर- मंगळवेढा चे आमदार समाधान आवताडे यांच्यासह अधिकारी व शेतकऱ्यांची उपस्थिती

सांगोला (कटूसत्य वृत्त):- मागील वर्षी भरपूर पाऊस झाल्याने पाण्याची कमतरता भासली नव्हती मात्र चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने पिकांना पाण्याची गरज असून टेंभू योजनेचे चालू आवर्तन सुरू करून शेतकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालय मध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीला मंगळवेढा -पंढरपुर चे आमदार समाधान आवताडे, टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेडीयार, उप अभियंता गायकवाड, केंगार यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते
टेंभूचे आवर्तन १६तारखेपासून सुरू केले असून लाभ क्षेत्रातील गावांना मागणीप्रमाणे पाणी देण्याचे नियोजन केले असून बुद्धेहाळ तलाव भरून घेण्यात येईल व माणनदीमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पाणी सोडण्यात यावे अश्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी बैठकीमध्ये केल्या.
आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर -मंगळवेढा तालुक्यातील माण नदीवरील चार बंधारे भरून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या तसेच कार्यकारी अभियंता राजन रेडीयार यांनी मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना पाणी देऊ व पाणीपट्टीची थकबाकी रक्कम लवकरात लवकर शेतकर्यांनी भरण्याची विनंती केली या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुर्यकांत घाडगे , कमरुद्दीन खतीब, संभाजी आलदर, पं स सदस्य सुभाष इंगोले, पांडुरंग मिसाळ, दगडू बाबर, साहेबराव शिंदे ,विकास मोहिते, जगदीश पाटील,शहाजी घाडगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
0 Comments