Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद पुरस्कार

 सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाला  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद पुरस्कार 

अकलूज (कटूसत्य वृत्त):-  येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते - पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अण्ड रिसर्च , शंकरनगर - अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयास उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय,भारत सरकारचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद पुरस्कार जाहीर झाला होता. सदर पुरस्कार महाविद्यालयास सोलापूरचे जिल्हाधिकारी  मिलींद शंभरकर  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . 
          सदर पुरस्कार " वन डिस्ट्रिक्ट वन ग्रीन चॅम्पीयन " या अंतर्गत देण्यात आला.त्याकरीता जिल्हयातून एकाच महाविद्यालयाची निवड केली गेली.महाविद्यालयाने केलेल्या कामाची दखल घेवून उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय,भारत सरकार यांनी महाविद्यालयाची सदर पुरस्कारासाठी निवड करून तो महाविद्यालयास प्रदान केला पुरस्कारासाठी महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.त्याचीच पोहोच पावती म्हणजे महाविद्यालयास मिळालेल्या पुरस्काराची व महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या व्हिडीओची क्लिप पंतप्रधान कार्यालयाने मागवून घेत महाविद्यालयास मिळालेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद पुरस्काराची दखल घेतली आसल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . इंद्रजीत यादव यांनी दिली.हे अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील व सचिव राजेन्द्र चौगुले यांचे मार्गदर्शन कार्यरत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments