Hot Posts

6/recent/ticker-posts

नजिक पिंपरी येथे बसविण्यात आले हायमास्ट दिवे

 नजिक पिंपरी येथे बसविण्यात आले हायमास्ट दिवे

         

मोहोळ (कटुसत्य वृत्त):- मोहोळ पंचायत समिती विद्यमान उपसभापती अशोक (नाना) सरवदे  यांच्या  निधीतून नजिक पिंपरी येथे 4 हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. संघर्ष तरुण मंडळ-नवा वाडा ,गणेश तरुण मंडळ-खरात वस्ती , रवि शिंदे वस्ती, विजय भुजंग वाघमोडे वस्ती या ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात आले.
 याचा लोकार्पण सोहळा सोलापूर जिल्हा परिषद सदस्य तथा लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या शुभहस्ते व उपसभापती अशोक(नाना)सरवदे ,समाजसेवक पै. दत्ताभाऊ सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. बसविण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांमुळे नवावाडा, खरात वस्ती, शिंदे वस्ती, वाघमोडे वस्ती परिसरातील रात्रीचा अंधार दूर झाला असून,रात्री-अपरात्री शेतातील मोटारी चालू करण्यासाठी  जी भीती वाटत होती ती दूर झाली आहे. लोकांना यामुळे  या परिसरात दिवे बसवल्यामुळे नागरिकांना जणू दिवाळीच आली आहे असे वाटत आहे. स्थानिक नागरिकांशी बोलताना नजिक पिंपरी गावाचा विकास होण्यासाठी   सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन मा.बाळराजे पाटील यांनी दिले व नजिक पिंपरी गावातील नागरिकांच्या समस्या ,प्रश्न सोडवण्याची व गावात अनेक विकासकामे करण्याची ग्वाही उपसभापती अशोक(नाना)सरवदे यांनी दिली. प्रमुख पाहुण्यांचे सत्कार  सरपंच रामभाऊ हळनोर यांनी केले. गावातील वस्तीवरील अंधार दुर केला म्हणून उपसभापती यांचे आभार अनिल म्हाळनोर यांनी मानले.
यावेळी गावचे पोलिस पाटील-तात्या पाटील ,माजी सरपंच रामभाऊ हळनोर,ग्रा.सदस्य-लक्ष्मण हळनोर,ग्रा.सदस्य-अनिल म्हाळनोर,मा. उपसरपंच-दिपक सरवदे,कृष्णदेव सलगर, सोहन लवटे, कृष्णदेव हळनोर,संदिप सरवदे,विक्रम प्रेक्षाळे,बंडू पाटील,सुनिल वाघमोडे,औदुंबर वाघमोडे,सुनिल गजघाटे,सागर सरवदे,मोहन काळे,किसन सरवदे आदींसह ग्रामस्त उपस्थीत होते.

Reactions

Post a Comment

0 Comments