Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला शहरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन संपन्न

 सांगोला शहरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन संपन्न



सांगोला/ (कटूसत्य वृत्त):- : सांगोला शहरातील शिवाजीनगर या भागातील विविध विकास कामांचे काल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत संजय गणपत काटे घराच्या पाठीमागील प्लॉटमधून 40 फुटी रस्त्यास जोडणारा रस्ता व गटार करणे - 28 लाख 77 हजार 718 रु, रेल्वे लाईन पूर्व बाजू पत्रकार वाघमारे यांच्या घराकडे जाणारा बोळ रस्ता काँक्रीट करणे - 4 लाख 71 हजार 43 रु, रेल्वे लाईन पूर्व बाजू रस्ता ते गाडे यांच्या घरामागून जाणारा रस्ता व गटार करणे - 18 लाख 40 हजार 302 रु, जगधने घर ते वाघमारे घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे - 11 लाख 61 हजार 261 रु. अशा एकूण सुमारे 63 लाख 50 हजार रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, माजी नगराध्यक्ष मारुती(आबा) बनकर, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, बांधकाम सभापती सौ. अप्सराताई ठोकळे, आरोग्य सभापती रफिक तांबोळी, महायुतीचे गटनेते आनंदा माने, आघाडीचे गटनेते सोमनाथ लोखंडे, नगरसेवक सुरेश माळी, नगरसेवक गजानन बनकर, नगरसेविका सौ. स्वातीताई मगर, नगरसेवक अस्मिर तांबोळी, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, नगरसेवक बाळासाहेब केदार, नगरसेवक जुबेर मुजावर, राजू मगर, पत्रकार रावीप्रकाश साबळे, पत्रकार बाबा वाघमारे, प्रशांत कांबळे, रमेश जाधव, शफी इनामदार, बाळासाहेब आसबे, अमोल लऊळकर, मोहन वाघमारे सर, बाळासाहेब केदार, धर्मा केदार, बापू केदार, श्रीनिवास साळुंखे, विनायक सोनवणे, राजू शिंदे, सुरेश गाडेकर, चारुशीला कांबळे, सुनील काटे यांच्यासह इतरही स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments