राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 28, 2021

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय

 



मुंबई, (कटूसत्य वृत्त):- राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तथापी, अद्यापही केंद्र शासनाने 2015 नंतर नुकसानभरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम 2019 च्या महापूरात देण्यात आलेल्या दराप्रमाणे आहे. त्यामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages