टेंभुर्णी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- येथील डॉक्टर्स असोसिएशन, टेंभुर्णीच्या वतीने उद्या *रविवार दिनांक २९ ऑगस्ट* रोजी रोटरी हॉल येथे सकाळी ९ ते संध्या. ५ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आपल्या समाजाची सर्व प्रकारे हानी झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या भितीमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी होऊन रक्तसाठा अपुरा पडल्याचे दिसत आहे. यावर मात करण्यासाठी डॉक्टर्स असोसिएशन, टेंभुर्णीच्या वतीने टेंभुर्णी व परिसरातील जनेतेला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हे जीवनदानच" आहे आणि रक्तदान करून आपण जनसेवा व देशसेवा करणार आहोत. तरी आपण सर्व मोठ्या संख्येने रक्तदान करूया. यावेळी मुक्ताई रक्तपेढी इंदापूर व शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढी अकलूज हे संकलनाचे काम करणार आहेत. रक्तदान केल्यानंतर १. प्रमाणपत्र व सन्मान २. रक्तदात्यास आयुष्यभर रक्त मोफत ३. रक्तदात्याच्या नातेवाईकास सवलतीच्या दरात रक्त पुरवठा. या सुविधा रक्तपेढीच्या वतीने पुरविण्यात येणार आहेत.रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ.सचिन ढवळे, डॉ.सचिन खटके व डॉ.धनाजी खताळ हे परिश्रम घेणार आहेत. यावेळी कोरोना संबंधित सर्व नियम व निर्जंतुकीकरणाची योग्य ती काळजी घेतली जाईल.
तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन डॉक्टर्स असोसिएशन, टेंभुर्णीचे अध्यक्ष डॉ सतिश वाघावकर व सचिव डॉ विनायकराव गंभिरे यांनी केले आहे.
0 Comments