भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी उजनी धरणावर जनहित शेतकरी संघटनेचे हालगीनाद आंदोलन
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-उजनी धरणामधून सीना माढा उपसा सिंचन योजनेकरिता उजवा कालवा लऊळ,भुताष्टे, चिंचोली,सापटणे-भो,घाटणे,शिंदेवाडी,वडाचीवाडी,रणदिवेवाडी,वेताळवाडी व माढा या गावातून ही योजना जात असून सीना माढा उजवा कालव्यासाठी बागायत (फळबाग)जमिनी गेलेल्या संपादित जमिनीचा मोबदला गेले कित्येक वर्षांपासून अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला नाही.कॅनॉल खोदाई करण्याच्या आधीच शासनाच्या कायद्याप्रमाणे संपादित जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायलाच पाहिजे होता.चालू बागायती दराप्रमाणे व फळझाडांचे मुल्यांकन करून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मोबदला त्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे अन्यथा 24 ऑगस्ट पासून कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर कार्यालयासमोर हालगीनाद आंदोलन छेडणार बाबतचे निवेदन दिनांक 11 ऑगस्ट रोजी जनहित शेतकरी संघटना अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,महसूल मंत्री,मुख्य अभियंता,विभागीय आयुक्त पुणे,जिल्हाधिकारी सोलापूर,अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर, तहसीलदार माढा,पोलीस निरीक्षक टेंभुर्णी यांना दिले होते त्याप्रमाणे 24 ऑगस्ट रोजी भिमानगर येथे उजनी धरण गेट समोर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी उजवा कालव्यावरील सर्वच भूसंपादन प्रक्रिया व मोबदला वाटप 22 मार्च पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशा प्रकारचे तसेच 1 सप्टेंबर पासून मोजणी करण्यात येईल असे पत्र जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांना उपकार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग यांच्यामार्फत देण्यात आले व हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख व उजनी ग्रामपंचायत सदस्य मल्हारी गवळी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments