Hot Posts

6/recent/ticker-posts

नागरिकांच्या मुलभूत सुविधांवर भर द्या- पालकमंत्री दत्तात्रय भरणे ड्रेनेज लाईनचे उद्घाटन

नागरिकांच्या मुलभूत सुविधांवर भर द्या- पालकमंत्री दत्तात्रय भरणे
ड्रेनेज लाईनचे उद्घाटन




            सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- शहरातील वृंदावन नगरजाईजुईनगरगणेशनगर नालंदानगरसमृद्धीनगरसिटीझन परिसरात ड्रेनेज लाईनच्या सुविधेमुळे नागरिकांची सोय होणार आहे. शहरात नव्याने वसाहती होत असल्याने येथील नागरिकांना रस्तेपाणीड्रेनेजलाईन यासारख्या मुलभूत सुविधा देण्यावर भर देण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. 

            अमृत योजनेंतर्गत वृंदावन नगरजाईजुईनगरगणेशनगर नालंदानगरसमृद्धीनगरसिटीझन येथील ड्रेनेज लाईनच्या उद्घाटनप्रसंगी भरणे बोलत होते. कार्यक्रमाला गटनेते आनंद चंदनशिवेनगरसेविका सुनिता रोटे, गणेश पुजारी यांच्यासह गटनेतेपदाधिकारीपरिसरातील नागरिक उपस्थित होते. 

            विकासाचा निधी नागरिकांच्या सुविधेसाठी असून सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांना सोयीसुविधा देण्यात याव्यात. शहरातील आवश्यक विकास कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाहीअसेही भरणे यांनी यावेळी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments