SBI सांगोला शाखेचा कारभार सुरक्षा रक्षकांच्या हाती, कोरोनाच्या नियमांना तुडविले जात आहे पायदळी.
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचा कारभार सुरक्षा रक्षकांच्या हाती असून पैशाची देवाण घेवाण,चेक क्लिअरन्स, आदि कामे सुरक्षा रक्षकच करीत आहेत. या सुरक्षा रक्षकांकडून पेन्शनधारक वयोवृद्ध नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. कोरोनाच्या नियमांचे कारण दाखवून एका सुद्धा ग्राहकांना शाखेत प्रवेश दिला जात नाही.या उलट शहरातील इतर बँकेत मात्र नियोजन बद्ध पद्धतीने लोकांना बँकेत प्रवेश दिला जात आहे. बँकेच्या बाहेर उभा केलेल्या मंडपामध्ये बैठक व्यवस्था अपुरी असल्याकारणाने अनेक ग्राहकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. मात्र उघड्या डोळ्यांनी खातेदारांचे हाल होत असल्याचे पाहणाऱ्या बँक मॅनेजरला आणि अधिकाऱ्यांना मात्र याचे वावडे नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. बँकेच्या या गलथान कारभारामुळे अनेक खातेदारांमध्ये बँकेच्या व्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.सध्या कोरोनाची संख्या दिवसेंदिवस सांगोला शहर आणि तालुक्यात वाढत आहे. बँकेच्या सर्वच शाखेत शासनाच्या नियमांचे पालन करून आर्थिक देवाण करण्याचे बँकांना आणि वित्तीय संस्थांना सांगितले आहे. कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या असताना स्टेट बँकेत मात्र ग्राहकांना बँकेत प्रवेश न देता बाहेरच ताटकळत उभे केले जात आहे. याचा त्रास अनेक खातेदारांना होत आहे. सुरक्षा रक्षकांच्या अरेरावीचा सामना खातेदारांना होताना दिसत आहे. या बँकेत ग्राहकांसाठी सॅनिटायझरची सोय नाही,सोशल डिस्टनस चा फज्जा उडत आहे.बँकेच्या बाहेर ताटकळत उभे राहणाऱ्या खातेदारांना बसण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था नाही,ना शुद्ध पिण्याचे पाणी नसल्याने बँक व्यवस्थापनाबद्दल सर्वत्र नाराजी पसरली आहे.
स्टेट बँकेच्या अनेक योजनांची माहिती घेण्यासाठी काही प्रतिष्ठित व्यक्ती येत असतात,पण या सुरक्षा रक्षकांमुळे कोरोनाचे नियम दाखवून बँक व्यवस्थापकाशी भेट दिली जात नाही.त्यामुळे बँकेच्या गलथान कारभारामुळे अनेक नागरिक मात्र त्रस्त झाले असल्याची चर्चा सर्वत्र पहावयास मिळत आहे.
0 Comments