कोरोना ने निधन पावलेल्या अंगणवाडी सेविका गुरव यांचे घरी सभापती राणीताई कोळवले आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली सांत्वनपर भेट

सांगोला (कटूसत्य वृत्त):- हटकर मंगेवाडी येथील सेविका सुवर्णा दादासो गुरव यांचे 12 मे 2021 रोजी कर्तव्य बजावत असताना कोरोनाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने त्यांचे घरी दुःखाचे सांत्वन करण्यासाठी पंचायत समिती सभापती राणीताई कोळवले व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती आसमा आतार, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती जयश्री शेटे यांनी भेट दिली . सुवर्णा गुरव यांचे पश्चात त्यांचे पती, दोन मुले ,सून व सासु-सासरे असा परिवार आहे. सुवर्णा गुरव यांनी 2020 मध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानामध्ये घरोघरी जाऊन थर्मल स्कॅनिंग तसेच सर्वे केले. मार्च 2021 पासून त्यांनी पॉझिटिव पेशंटच्या घरी जाऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, लसीकरणासाठी गावातील याद्या तयार करणे व सर्वे करणे ग्रामपंचायत पातळीवरील समितीमध्ये कोरोना विषयक सर्व कामांसाठी मदत करणे इत्यादी कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी पंचायत समिती अधिकारी पदाधिकारी मार्फत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कोरोना चे कर्तव्य बजावत असताना त्यांचे निधन झाले असल्याकारणाने शासनस्तरावरून त्यांना सानुग्रह निधी व एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत एल आय सी विमा मिळवून देण्याचे आश्वासन सभापती कोळवले मॅडम यांनी दिले .यावेळी ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब शिंदे अंगणवाडी सेविका कलावती भुसनर व मदतनीस सुगंधा भुसनर हजर होत्या.
0 Comments