कोरोनाच्या काळात पंचायत समिती,जि.प. सदस्य झाले भूमिगत
गणातील अनेक नागरिकांनी सदस्यांवर व्यक्त केली नाराजी
सांगोला (जगन्नाथ साठे):- सांगोला तालुक्यातील कोरोनाची संख्या हजारोंच्या घरात गेली असून स्थानिक स्वराज्य संस्थेतील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला जोडणारा महत्वाचा घटक म्हणून गावपातळीवरील ग्रामपंचायतीला ओळखले जाते.सांगोला तालुकयातील 14 पंचायत समिती गण आणि 7 जिल्हा परिषद गणातील प्रतिनिधीत्व करणारे सदस्य मात्र भूमिगत झाले असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र मोजक्याच जि प सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांनी गावोगावी जावून नागरिकांना धीर देण्याचे काम केले आहे.
आपल्या सदस्य फंडातून आरोग्यावर खर्च करण्यासाठी विशेष निधी या गणातील सदस्यांना दिला जातो. त्या प्राप्त निधीतून प्रत्येक गावाला समान पद्धतीने निधी देवून आरोग्याच्या संलग्न बाबीवर खर्च करण्याची तरतूद असताना अनेक गणातील सदस्य मात्र भूमिगत असल्याचे चित्र अनेक गावातील नागरिकांनी बोलून दाखविली. कोरोनाच्या काळातील कोणत्याही जनजागृती च्या कार्यक्रमाचे आयोजन अथवा नियोजन किंवा लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात काही मोजके सदस्य सोडले तर कुणीही रस दाखविला नाही.त्यामुळे तालुक्यातील गणातील अनेक गावातील सरपंच,उपसरपंच आणि नागरिक मात्र या लोकप्रतिनिधींवर नाराज असल्याचे दिसत आहेत.
सांगोला तालुक्यातील अनेक गावे कोरोनाची हॉटस्पॉट केंद्रे बनली आहेत.त्या गावातील संख्या कमी करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन ,आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन ,महसूल प्रशासन प्रयत्न करत असताना गणातील काही मोजके सदस्य सोडले तर इतर सदस्यांनी मात्र गणातील गावे वाऱ्यावर सोडले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
येणाऱ्या काळात तरी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या या सदस्यांनी आपल्या गणातील गावातील सरपंच आणि ग्रा सदस्य यांना विश्वासात घेवून नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न करावा,ज्यांनी दोन दोन वर्ष गणातील गावांना भेटी दिल्या नाहीत त्यांनी तरी अडचणीच्या काळात नागरिकांमध्ये जावून त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात,अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
0 Comments