मोहोळ शहरातील नागरिकांना स्वतंत्र लसीकरण केंद्र उपलब्ध करून द्यावे - सत्यवान देशमुख

मोहोळ (कटूसत्य वृत्त): सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यात सर्वात जास्त कोरोना विषाणूने थैमान घातले असून शहरातील अनेक नागरिकांचा उपचार अभावी मृत झाला आहे. मोहोळ शहराची लोकसंख्या लक्षात घेता शहरामध्ये केवळ ग्रामीण रुग्णालयात एकमेव लसीकरण केंद्र आहे. ४५ वर्षांपुढील जेष्ठ नागरिकांना लसीकरण करताना लोकसंख्या जास्त असल्यामुळे तुटवडा जानवत व अद्याप दुसऱ्या डोस ची लस उपलब्ध झाली नाही. तसेच १८ वर्ष पुढील लोकांनाही लसीकरण सुरु झाल्यानंतर अक्कलकोट, सोलापूर,पुणे,टेंभूर्णी या दुसऱ्या शहरातून व जिल्ह्यातून नागरिक लस घेण्यसाठी येत आहेत. त्यामुळे मोहोळ शहरातील नागरिकांना स्वतंत्र लसीकरण केंद्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी केली आहे.
मोहोळ येथील नागरिकांना स्वतंत्र अशी केंद्र उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी प्रशासनाला निवेदन दिले असून यामध्ये म्हटले आहे की, सध्या अतिशय अल्प प्रमाणात लसीची संख्या उपलब्ध होत आहे. त्यात बाहेरून शहरातील येणाऱ्या नागरिकांनी गर्दी करून लस घेतली जात आहे. त्यामुळे मोहोळकर लसीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे मोहोळ शहरातील नागरिकांना लस उपलब्ध होत नाही. तर ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र मोहोळ शहरातील नागरिकांना लस देत नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. याबाबत तत्काळ दखल घेऊन मोहोळ शहरासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करावे व बाहेरून लसीकारणासाठी आलेल्या नागरिकांची कोरोना टेस्ट करूनच त्यांचे लसीकरण करण्यात यावे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाच्या गेट समोर आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये दिला आहे.
0 Comments