माळशिरस तालुक्यात कडक उपाय योजना करणे गरजेचे आहे - जिल्हाधिकारी शंभरकर
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्याची वाढती कोवीड रुग्णसंख्या पाहता, कडक उपाय योजना करणे करजेचे आहे.संसर्ग रोखण्यासाठी गावपातळी पासुन सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे.संसर्ग कमी करुन लोकांचे जीव वाचविण्यासाठी प्रशासन नेहमीच सकारात्मक भुमिकेत आहे.त्या दृष्टीकोनातुन माळशिरस तालुक्याला प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी अकलुज येथे दिली.
सोलापुर जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोनाचा संसर्ग माळशिरस तालुक्यात आहे.वाढता संसर्ग रोखण्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना विषयीची जिल्हातील प्रमुख प्रशासकीय आधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त आढावा बैठक अकलुज येथे पार पडली.त्यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर उपस्थीत असलेल्या सर्व विभागातील अधिकारी ,कर्मचारी यांना वाढता संसर्ग रोखण्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले.तसेच अकलुज व तालुक्यातील कोवीडवर उपचार करणार्या डॉक्टरांच्या ,शासकीय आरोग्य खात्याच्या समस्या जाणुन घेत त्या समस्यांचे निराकरण करण्यचे अश्वासन दिले.
याबैठकीसाठी उपजिल्हाधिकारी संजीवकुमार जाधव,जिल्हा पोलीस आधिक्षक तेजस्वी सातपुते ,,आ.राम सातपुते,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील ,प्रांताधिकारी शमा पवार,उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु,डॉ.एम.के.इनामदार,तालु का आरोग्य अधिकारी .डॉ.रामचंद्र मोहिते,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रेणिक शहा आदींसह अकलुज व तालुक्यातील डॉक्टर उपस्थीत होते.
पुढे बोलताना मिलींद शंभरकर यांनी कोविड रुग्णांवर उपचार करताना खाजगी व शासकीय आरोग्य यंत्रणांना करण्यात येणार्या समस्यांची माहिती घेत.सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत संबधीत अधिकार्यांना त्याबाबत सुचना दिल्या.तसेच माळशिरस तालुक्यातील वाढत्या रुग्णसंखेवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व यंत्रणांना सफाई कर्मचाऱ्यांपासुन औषधांपर्यंत सर्व प्रकारचे सहकार्य प्राधान्य क्रमाने करण्याची तयारीही यावेळी दर्शविली.
तसेच तालुक्यात टेस्टींग,ट्रेसींगवर भर देवुन कोरोना विरोधी मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या सुचनाही शासकीय अरोग्य यंत्रणेंना दिल्या.त्याचप्रमाणे संसर्ग कमी करण्यासाठी तालुक्यातील दाट लोकसंख्येच्या अकलुज,नातेपुते ,माळशिरस ,नातेपुते ,वेळापुर व महाळुंग या गावामधुन जनता कर्फ्युचे नियोजन करण्याचेही आमदार मोहिते-पाटील व आ.सातपुते यांना सुचविले.
ॲम्ब्युलन्सची कमतरता स्कुल बस भरुन काढणार-जिल्हाधिकारी
माळशिरस तालुक्यासाठी सोलापुर येथे येणार्या २५ क्सीजन कन्सन्ट्रेटर पैकी १०ते १५माळशिरस तालुक्यासाठी देणार.
भविष्यातील तिसरी लाट लहान मुलांना घातक आहे. त्याचा सामना करण्यासाठी पंढरपुर येथे लहान मुलांसाठी सर्व सोईयुक्त दोन हॉस्पिटल सज्ज आहेत.त्याच प्रकारची हॉस्पिटल अकलुजमध्येही तयार करण्यासाठी प्रयत्न करा.माळशिरस तालुक्यात रुग्णवाहीकांची कमतरता स्कुल बस अधिग्रहीत करुन भरुन काढावी.
0 Comments