कोरोना तपासणीच्या भीतीने नागरिक रस्त्यावर आले नाहीत
अकलूज (कटूसत्य वृत्त):- कोरोनाच्या दुसऱ्या लाठेनेही सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण केले आहे.सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता, जिल्हाधिकारी यांनी 21 मे ते 1 जून पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनची घोषणा केली.आणि विनाकारण रोडवरती येणारे यांना पाचशे रुपये दंड व वहान जप्त असा आदेश काढण्यात आला.तर माळशिरस तालुक्यातील प्रशासनाने रस्त्यावर दिसेल त्याची तपासणी करण्यात येईल असा फतवा काढल्यामुळे कोरोना तपासणीच्या भीतीपोटी नागरिक रस्त्यावर आले नाहीत. महाभयानक आशा प्राणघातक कोरोना सारख्या क्रूर विषाणूने जगाच्या पाठीवर थैमान घातले असून, त्याने कित्येकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. आपल्याकडे कोरोनारूपी राक्षसाचा शिरकाव पाहता! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असले तरी आपले शासन, प्रशासन,डॉक्टर यंत्रणा, पोलिस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा स्वतःचा जीव धोक्यात घालून खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे राहत सर्वप्रकारे जनतेला मदतीचा हात देत आहेत. असे असतानाही विनाकारण रत्यावरती फिरणे, मास्कचा वापर न करणे, शासनाचे नियम न पाळणे असा काहीसा प्रकार घडत होता.यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वेगाने संसर्ग होऊ लागला. ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता जिल्हाधिकारी यांनी 21 मे 1जून पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनची घोषणा करीत पाचशे रुपये दंड व व हान जप्तीचा आदेश दिला. तर माळशिरस तालुका प्रशासनाने रस्त्यावर दिसेल त्याची तपासणी करण्यात येईल असा इशारा दिल्यामुळे कोरोना तपासणीच्या भीतीने नागरिक रस्त्यावर आले नाहीत.तर जे आले त्यांची तपासणी करण्यात आली.
0 Comments