Hot Posts

6/recent/ticker-posts

" कुटुंब सुपर मार्केटला प्रशासनाचा दणका, सुपर मार्केट आणि कविराज मंगल कार्यालय केले सील"

 " कुटुंब सुपर मार्केटला प्रशासनाचा दणका, सुपर मार्केट आणि कविराज मंगल कार्यालय केले सील"



सांगोला (जगन्नाथ साठे):- सांगोल्यात निर्धारित वेळेनंतरही दुकान चालू ठेवल्याने वासूड रोडवर असणाऱ्या कुटुंब सुपर मार्केटला कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून निर्धारित वेळेनंतर ही दुकान चालू ठेवल्याने तहसीलदार अभिजित पाटील,नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे,पोलीसअधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने दुकान सील केले तर महुद रोडला असणाऱ्या कविराज मंगल कार्यालयाला सील करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.  
        
        कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असूनही अत्यावश्यक सेवेतील दुकान सकाळी ११ नंतरही चालू ठेवले . दुकानमालकाने ६० ते ७० ग्राहकांना आत घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला . या प्रकरणी तहसीलदार अभिजित पाटील , मुख्याधिकारी कैलास केंद्रे,पोलीस प्रशासन यांच्या पथकाने दुकान सील केले , तर लग्नासाठी २५ पेक्षा जास्त लोक जमवल्याप्रकरणी कविराज मंगल कार्यालयाच्या मालकास सुमारे पाच हजार रुपयाचा दंड केला . ही कारवाई गुरुवारी सकाळी ११ ते १ या वेळेत सांगोला शहरात केली . सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील आस्थापनेवगळता सर्व व्यवसाय , उद्योगधंदे बंद ठेवून जिल्हाधिकारी यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे . मात्र अत्यावश्यक सेवेतील दुकानदार सकाळी ७ ते ११ ही वेळ ठरवून दिली असतानाही निर्धारित वेळेनंतरही दुकाने चालू ठेवल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले . त्यानुसार सांगोला नगरपालिका, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकातील तहसीलदार अभिजित पाटील , मुख्याधिकारी कैलास केंद्रे , पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने गुरुवारी सांगोला वासूद रोड येथील कुटुंब सुपरमार्केट सकाळी ११ नंतरही चालू ठेवून ६० ते ७० ग्राहकांना आत घेऊन गर्दी केल्याचे दिसून आले . त्यानुसार हे दुकान सील केले . तसेच २५ पेक्षा जास्त लोकांना जमवून लग्नसमारंभ आयोजित केल्याने कविराज मंगल कार्यालयाच्या मालकास पाच हजार रुपयांचा दंड केला .
           कुटुंब सुपर मार्केट व्यवस्थापनाला या पूर्वी ही नगरपालिका प्रशासनाच्या वतीने वारंवार कोरोनाचे नियम मोडत असल्याची जाणीव नगरपालिका कर्मचाऱ्यानी करून दिली होती, तरीही आपले कोणीच काही करू शकत नाही, या अविर्भावात असणाऱ्या या दुकान मालकांला प्रशासनाच्या वतीने दणका दिल्याने कोरोनाचे नियम मोडणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना एक प्रकारची चपराक बसल्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments