सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 1395 कोरोना पॉझिटिव्ह, 2132 झाले बरे, तर 32 मृत्यू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे शनिवारी सोलापूर शहरात 40 नवे रुग्ण तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1355 नवे रुग्ण आढळून आले असून शहर आणि ग्रामीण भागात काल एका दिवसात 1395 नवे रुग्ण आढळले आहेत.
शनिवारी सोलापूर शहरात 3135 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 40 पॉझिटिव्ह आहेत तर 3095 निगेटिव्ह आले आहेत. आता शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 27846 झाली आहे.
शनिवारी शहरात 03 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर शहरात आतापर्यंत 1341 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 25680 जण घरी परतले आहेत. तर 825 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी ग्रामीण भागातील 9748 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 1355 पॉझिटिव्ह आहेत तर 8393 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 115737 झाली आहे.
शनिवारी तब्बल 29 जणांचा कोरोनमुळे मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत 2393 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 98184 जण घरी परतले आहेत. तर 15161 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments