सांगोल्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर - आ. शहाजीबापू पाटील
फिरता पशुवैद्यकीय दवाखाना व 102 नंबर रुग्णवाहिकेचे लोकार्पण
सांगोला (कटूसत्य वृत्त):- केंद्रीय आरोग्य विभागाकडे केलेल्या पत्रव्यवहाराला यश मिळाले असून सांगोल्यासाठी केंद्र सरकारचा फिरता दवाखाना मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत तालुक्यातील जनावरांवर तातडीने उपचार होण्यासाठी सुसज्ज फिरता पशुवैद्यकीय दवाखाना मिळाला आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयासाठी सुसज्ज अशी 102नंबरची रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एक कार्डियाक रुग्णवाहिका सांगोला तालुक्यासाठी दिली आहे. यापुढील काळात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरून सांगोला तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जाईल असे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले.
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत फिरता पशुवैद्यकीय विभागासाठी वैद्यकीय दवाखाना व 102नंबर रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पार पडला, त्यावेळी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते. या अत्याधुनिक रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी हलविणे सोयीचे होणार आहे.
याप्रसंगी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, चंद्रकांत देशमुख, सभापती राणी कोळवले, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.बाबर, कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे, जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, नगरसेवक सोमेश यावलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सीमा दोडमणी, उपसभापती तानाजी चंदनशिवे, गणेश कांबळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम फुले, डॉ.श्रीकांत सुर्वे, डॉ.अस्लम सय्यद आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना महामारीचे संक्रमण वाढत आहे. महामारीच्या काळात गंभीर रुग्णास जिल्ह्याच्या अथवा तालुक्याबाहेर अन्य ठिकाणी हलविण्यासाठी या अत्याधुनिक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जीव वाचविणे हाच प्रयत्न राहणार आहे. ग्रामीण भागातील जनावरांना तातडीने उपचार मिळण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत फिरता पशुवैद्यकीय दवाखाना मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माणसासारखे जनावरांवर प्रेम असल्याने उपचार करण्यासाठी रुग्णवाहिका दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर ग्रामीण रूग्णालयासाठी महिलांना तातडीने उपचार मिळण्यासाठी सुसज्ज अशी 102 रुग्णवाहिका मिळाली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही रुग्णवाहिका दिली असून त्या रुग्णवाहिकेत इतर अत्याधुनिक सुविधा तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच केंद्रीय आरोग्य विभागाला केलेल्या पत्रव्यवहाराला यश मिळाले असून केंद्र सरकारचा फिरता दवाखाना मंजूर झाला आहे. लवकरच तो दवाखाना सांगोला तालुक्याला मिळणार आहे. यासाठी शासनाने जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार केला आहे. कोरोनाच्या काळात प्रत्येक नागरिकाला मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध मिळण्यासाठी
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरून सांगोला तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जाईल असे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले.
0 Comments