शेती अवजारे पाहण्यासाठी खासदार आमदारांच्या भेटी


कळंब (कटूसत्य वृत्त):- शहरात तरुण उद्योजक आशोक काटे यांनी शेतीसाठी लागणारे ए टू झेड अवजारे शेतक-यासाठी उपलब्ध करून दिली आहेत, शेतकऱ्यासाठी अगदी माफक दरात देत असल्याने त्याचा फायदा उस्मानाबाद-बीड-लातूर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात झाल्याचा पाहून उस्मानाबाद चे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील घाडगे यांनी दि. २१ रोजी या शेती अवजारांची पाहणी करून आधुनिक तंत्रज्ञानाचे वापरली जाणारी अवजारे ग्रामीण भागापर्यंत पोच करण्याचे काम या तरुण उद्योजकांनी केल्यामुळे त्यांनी या उद्योजकाचे कौतुक केले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार कैलास दादा पाटील , नंदूराजे निंबाळकर नगराध्यक्ष यांनी या नविन BBF पेरणी यंत्र ची पाहानी केली या वेळेस
नृसिंह ट्रेलर चे मालक आशोक काटे यांनी या यंत्राची व शेती अवजारे ची माहिती दिली.
0 Comments