शिवसेना नगरसेवक सत्यवान देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना संपर्क कार्यालयात सत्कार संपन्न


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- शिवसेनेचे नगरसेवक आणि मोहोळ शहरातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले युवानेते सत्यवान देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये शिवसेनेचे अभ्यासू संघटक नागेश वनकळसे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड आणि तालुका प्रमुख अशोक बापू भोसले शिवसेना गटनेते महादेव गोडसे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते सत्यवान देशमुख यांना शाल श्रीफळ फेटा देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे नेते बाळासाहेब गायकवाड शिवसेना तालुका प्रमुख अशोक बाप्पू भोसले शिवसेना संघटक नागेश वनकळसे, शिवसेना गटनेते चंद्रकांत गोडसे महादेव इंगळे गणेश गावडे, आलेश मोरे, सोमनाथ बापू पवार इत्यादीसह मोहोळ शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी शिवसेना युवा नेते सत्यवान देशमुख म्हणाले की शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून मी नगरसेवक पदी कार्यरत आहे. या काळात अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावू शकलो. त्याचबरोबर पाणीपुरवठा, वीज पुरवठा रस्त्यांचा दर्जा या विवीध संदर्भातल्या समस्या देखील अस्थेवाईकपणे सोडवल्या. त्यामध्ये शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे, नगरसेवकांचे, शिवसैनिकांचे बहुमोल सहकार्य मला लाभले. माझ्या वाढदिवसानिमित्त या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात होत असलेला हा सत्कार नक्कीच माझ्या दृष्टीने अविस्मरणीय असून त्यामुळे शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन सदैव पक्षासाठी लढण्याची उमेद वाढली आहे असेही देशमुख यावेळी म्हणाले.
0 Comments