Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ शहराचा संपूर्ण क्षमतेने विकास फक्त राष्ट्रवादीच करू शकते.. विकासाचा शब्द पूर्ण केल्याचे समाधान आमदार यशवंत माने यांचा विश्वास

 मोहोळ शहराचा संपूर्ण क्षमतेने विकास फक्त राष्ट्रवादीच करू शकते.. विकासाचा शब्द पूर्ण केल्याचे समाधान
आमदार यशवंत माने यांचा विश्वास

                    
      
मोहोळमध्ये घेतली राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठक

मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ शहर हे तालुक्याचे शहर असल्याने वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात रस्ते पाणी आरोग्य आणि विजेसंदर्भातच्या समस्या त्याचबरोबर स्वच्छतेच्या उपक्रमासाठी देखील आवश्यक त्या उपाययोजना साठी मी शासन स्तरावरून निधी कमी पडू देणार नाही. फक्त मोहोळ शहरातील कामांचा दर्जा पदाधिकारी आणि अधिकारी यांनी लक्ष ठेवुन टिकवला पाहिजे.  त्यामुळे येत्या काळातही विकासाचे ही विकासधारा अखंडपणे सुरु ठेवण्यासाठी मोहोळ शहरातील सुजाण आणि सुज्ञ जनता नक्कीच राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास मोहोळचे दक्ष आमदार यशवंत माने यांनी विकास कामांच्या पाहणी नंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.मोहोळ तहसील कार्यालय येथे गवत्या मारूती चौक या डांबरीकरणाच्या कामाची पाहणी आमदार यशवंत माने यांनी केली त्यानंतर आयोजित राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या.मोहोळ शहराच्या सतराच्या सतरा प्रभागात कोणकोणत्या भागात काय काय अडचणी आहेत ? आणखी किती निधीची आवश्यकता आहे ? त्याचबरोबर विकास कामे करताना काय काय अडचणी आहेत या  या सर्व बाबींचा सविस्तर तपशील मोहोळ शहरातील नगरसेवकांची बैठक बोलावून आमदार यशवंत माने यांनी जाणून घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील अडीअडचणी मांडल्या.याशिवाय इतरही प्रभागातील कामे पूर्ण करण्यासाठी आणखी किती निधी लागेल ? या बाबी देखील आमदार यशवंत माने यांना सुचवल्या. यावेळी आमदार यशवंत माने यांनी येत्या काळात मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासाचा उर्वरित टप्पा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी या नात्याने पूर्ण ताकतीने  शासन दरबारी पाठपुरावा मी करत राहणार आहे .माजी आमदार राजन पाटील यांच्या बहुमोल सहकार्याने मोहोळ शहराच्या विकासात्मक चेहरामोहरा बदलण्यासाठी मी सदैव दक्ष राहणार आहे. अशी ग्वाही देखील यावेळी आमदार माने यांनी उपस्थित नगरसेवकांना दिली.यावेळी पं.स. सदस्य तथा मोहोळचे राष्ट्रवादी मार्गदर्शक अजिंक्यराणा पाटील, नगराध्यक्षा शाहीन शेख, उपनगराध्यक्ष प्रमोद बापू डोके, मुस्ताक अहमद शेख, शौकतभाई तलफदार, संतोष सुरवसे, रोहित अण्णा फडतरे, अतुल गावडे, सुरेश दाजी गाढवे, दत्तात्रय भाऊ खवळे, संतोष खंदारे, संतोष वायचळ, राष्ट्रवादी संघटक सुरेश कांबळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रुपेश तथा कुंदन धोत्रे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ सुतार, बंडू देशमुख, जयवंत गुंड इत्यादीसह राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.केवळ एकाच वर्षात मी राज्याचे वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून तब्बल दहा कोटींचा विशेष निधी आणू शकलो याचे मला समाधान आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या सहकार्याने देखील भरीव निधी आणण्यामध्ये राष्ट्रवादीचे योगदान आहे. हे शहरातील जनता कधीही विसरू शकणार नाही. मोहोळ शहराला शहरीकरणाचा दर्जा मिळवून देण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे योगदान मोठे आहे. राष्ट्रवादी हाच पक्ष संपूर्ण क्षमतेने मोहोळ शहरातील विकास कामे पूर्ण करू शकतो ही बाब आता सर्वांना पटली आहे. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत शहरातील सर्व स्तरातील जनता राष्ट्रवादीलाच खंबीरपणे बहुमत देऊन पुनश्च राष्ट्रवादीच्या ताब्यात शहराच्या सत्तेची सूत्रे देणार आहे यात तिळमात्र शंका नाही.आमदार यशवंत माने मोहोळ विधानसभा.

Reactions

Post a Comment

0 Comments