पैगंबर मोहम्मद यांच्चा बद्दल अपशब्द वापरणाऱ्या सरस्वती यांच्यावर कारवाई करा - जमियात उलमा ए हिंद


मोहोळ (कटुसत्य वृत्त):- अखिल भारतीय संत परिषदेचे नरसिंहानंद सरस्वती यांनी मुस्लीम धर्माचे पैगंबर मोहम्मद सल्ला वसल्लम यांच्याबद्दल अपशब्द बोलले असल्याचे मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या आहेत सदर नरसिंहानंद सरस्वती यांच्या वर कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी जमियात उलमा ए हिंद तालुका मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा आणि जनसामान्यांच्या भावनेचा विचार करून सदर व्यक्ती वर त्वरित गुन्हा दाखल करावा असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. असे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे आणि मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी
हाफिस मुजीब शेख कारी इंतजार साब अब्दुल कलाम मौलाना जुबेर अल्ताफ शेख सर उमर शेख हाजी बिलाल शेख हजरत शेख जिब्राईल शेख नसीर शेख समीर शेख इत्यादी उपस्थित होते.
0 Comments