कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची दृकश्राव्य प्रणालीद्वारे आढावा बैठक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 19, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची दृकश्राव्य प्रणालीद्वारे आढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची दृकश्राव्य प्रणालीद्वारे आढावा बैठक

          मुंबई, (कटूसत्य वृत्त): देशातील कोरोना महामारी संदर्भातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांचे विधानपरिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे आज आढावा बैठक घेतली.

          या बैठकीस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्यासह विविध राज्याचे विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती आणि संसदीय कार्यमंत्री उपस्थित होते.

          संसदीय कार्यमंत्री अनिल परब म्हणाले की, राज्यातील कोरोना संदर्भातील परिस्थिती नियंत्रणात असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजनामुळे मृत्युदर कमी आहे. असंघटित कामगारांना शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. कोरोना रूग्णांसाठी केलेल्या उपाययोजना, रुग्णांना उपलब्ध बेड्स, ऑक्सीजनचा पुरवठा, लसीकरण यांची माहिती देऊन, कोरोना महामारीस नियंत्रणात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाई, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी काही प्रमाणात ताळेबंदीसह कडक निर्बंध लादण्यात आले असल्याची माहिती या बैठकीत श्री.परब यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages