Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर ग्रामीण भागात 709 कोरोना पॉझिटिव्ह,तर 17 मृत्यू

 सोलापूर ग्रामीण भागात 709 कोरोना पॉझिटिव्ह,तर 17 मृत्यू



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 709 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 59018 झाली आहे.

          सोमवारी ग्रामीण भागातील 4837 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 709 पॉझिटिव्ह आहेत तर 4128 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 59018 झाली आहे.

          आज तब्बल 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत 1415 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 50293 जण घरी परतले आहेत. तर 7311 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Reactions

Post a Comment

0 Comments