Hot Posts

6/recent/ticker-posts

अकरा कागदपत्रांच्या आधारे मिळणार मतदानाची संधी

अकरा कागदपत्रांच्या आधारे मिळणार मतदानाची संधी

पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):-  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदार ओळखपत्र नसेल तर भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या अकरा कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र असल्यास मतदान करता येणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

मतदारांना मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र हा प्रमुख दस्तऐवज पुरावा म्हणून लागतो. मतदार ओळखपत्र नसेल तर खालीलपैकी  एका कागदपत्राच्या पुराव्याच्या आधारे मतदान करता येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अकरा कागदपत्रांची यादी पुढील प्रमाणे 1) आधार कार्ड २) मनरेगा जॉब कार्ड ३) बँक व पोस्ट कार्यालयाने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक 4) कामगार मंत्रालयाच्या योजनेतंर्गत निर्गमित केलेले विमा स्मार्ट कार्ड 5) वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) 6) राष्ट्रीय  लोकसंख्या नोंदणीतंर्गत भारताचे नोंदणी महानिबंधक यांनी निर्गमित केलेले स्मार्ट कार्ड 7) फोटो असलेले निवृत्ती वेतनविषयक कागदपत्र 8) केंद्र, राज्य, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी छायाचित्रासह निर्गमित केलेले कार्यालयीन ओळखपत्र 9) लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य यांना निर्गमित केलेले कार्यालयीन ओळखपत्र 10) पॅन कार्ड 11) भारतीय पासपोर्ट

तसेच भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदाना दिवशी आणि त्याअगोदरच्या दिवशी उमेदवारांना मुद्रीत माध्यमातून जाहिरात द्यायची असेल तर ती प्रमाणित करुन घेणे गरजेचे आहे आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. अशा जाहिराती जिल्हा स्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीमार्फत प्रामाणित करुन प्रकाशित करावी.त्यासाठी संबधित समितीकडे विहित नमुन्यात जाहिरातीच्या डिझाईनसह वेळेत सादर करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

Reactions

Post a Comment

0 Comments