भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आज जिल्हा प्रशासनातर्फे जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील, विजय काकडे, विजय लोंढे शंतनू गायकवाड, गणेश खरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments