Hot Posts

6/recent/ticker-posts

पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीत तात्काळ कोवीड केअर सेंटर सुरू करावे- शिवतेजसिंह

पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीत तात्काळ कोवीड केअर सेंटर सुरू करावे- शिवतेजसिंह

अकलूज (कटूसत्य वृत्त): माळशिरस तालुक्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येंच्या पार्श्‍वभूमीवर अकलूज येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीत तात्काळ कोवीड केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी अकलूज ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.

आज माळशिरस तालुक्यात सुमारे 1004 कोरोनाग्रस्त रूग्ण उपचार घेत आहेत. तर आणखी 9456 रूग्णांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. 8274 रूग्ण या भयंकर आजारातून बरे झाले असले तरी 174 रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तालुक्यातील बहुतांश हॉस्पीटल्स पूर्ण क्षमतेने रूग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळे नवीन रूग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत. शिवाय महाळूंग येथील कोवीड केअर सेंटर येथे 100 रूग्णांवर उपचार करण्याची क्षमता असताना येथेही 70 पेक्षा अधिक रूग्ण उपचार घेत आहेत त्यामुळे येथेही लवकरच बेड उपलब्ध होणार नाहीत असा अंदाज आजच्या परिस्थितीवरून निदर्शनास येत आहे.

त्यामुळे प्रशासनाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन अकलूज येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या प्रशस्त इमारतीत 400 ते 500 बेडचे जम्बो कोवीड केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.

उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मागणीनुसार प्रांतअधिकारी शमा पवार यांच्याकडून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीत कोवीड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. लवकरच येथे 500 बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात येईल. - डॉ.रामचंद्र मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी माळशिरस

Reactions

Post a Comment

0 Comments