Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद पुरस्कार जाहीर

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाला  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद पुरस्कार जाहीर

डॉ . इंद्रजीत निवासराव यादव 

          अकलूज (कटूसत्य वृत्त): येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते - पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयास दि . २६/०४/२०२१ रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय, भारत सरकारचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजीत यादव यांनी दिली.

          सदर पुरस्कार “वन डिस्ट्रिक्ट वन ग्रीन चॅम्पीयन" या अंतर्गत देण्यात आला . त्याकरीता जिल्हयातून एकाच महाविद्यालयाची निवड केली गेली . आमच्या महाविद्यालयाने केलेल्या कामाची दखल घेवून उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय , भारत सरकार यांनी महाविद्यालयाची सदर पुरस्कारासाठी निवड केली.  

          सदर पुरस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते - पाटील, सचिव  राजेंद्र चौगुले, प्राचार्य डॉ. इंद्रजीत यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .सदर पुरस्कारासाठी महाविद्यालयामध्ये कृती समिती गठित करण्यात आली होती. त्या कृती समितीचे समन्वयक म्हणून सिव्हील विभागाचे विभागप्रमुख प्रा. सागर फुले व सिव्हील विभागातील प्रा. शंकर गोडसे, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले . सदर पुरस्कारासाठी महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments