आमदार खासदार यांनी आपापल्या मतदार संघात कोविड सेंटरसाठी प्रयत्न करावेत - रोहन सुरवसे पाटील
पुणे (कटूसत्य वृत्त): आपल्या राज्यात दिवसेंदिवस कोरोनाने थैमान घातले असून आपल्या राज्यातल्या सर्वच आमदार खासदार यांनी आपापल्या मतदार संघात कोविड सेंटर साठी प्रयत्न करावेत असे मत स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना रोहन सूरवसे पाटील म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट वाट लावू लागली आहे. कोरोनाने सामान्य सर्वसामान्य जनतेची, गोरगरिबांची रोजी रोटी हिरावून घेतली आहे. एका बाजूला जगने अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये जर कोविडचे संकट आले तर उपचारासाठी कुठून पैसे आणावेत या विचारत काहीजण गेलेत. जर आमदार खासदार यांनी आपापल्या मतदार संघात कोविड उपचार केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला तर रुग्णांची गैरसोय होणार नाही.! आणि आपले मत योग्य माणसाला गेले याचे समाधान रुग्णाला झाल्याशिवाय राहणार नाही.तर आपापल्या मतदार संघात अत्यंत महान कार्य करण्याची संधी आहे.ते करून आपल्या मतदाराच्या ह्रदयात मानाचे स्थान मिळवा असे रोहन सुरवसे पाटील म्हणाले.
0 Comments