Hot Posts

6/recent/ticker-posts

लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना योद्ध्यांचे आभार

लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना योद्ध्यांचे आभार

          मुंबई, (कटूसत्य वृत्त): महाराष्ट्राने कोरोनाविरुद्धच्या लढाईत  दीड कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा आज पार केला. राज्य कोरोनामुक्त करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. असे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी म्हटले आहे.

          उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी आपल्या संदेशात म्हणतात, राज्याच्या कोरोनामुक्तीसाठी जीवाची जोखीम पत्करून योगदान देत असलेले डॉक्टर, नर्सेस, फार्मसिस्ट, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई, पोलीस, राज्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, राज्यातील समस्त नागरिक बंधू-भगिनींच्या सामूहिक प्रयत्नांना वंदन. सर्वांचे मनापासून आभार.

Reactions

Post a Comment

0 Comments