अकलुजमध्ये 300 बेडचे केअर सेंटर सुरु करण्याचा विचार-प्रातांधिकारी शमा पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 9, 2021

अकलुजमध्ये 300 बेडचे केअर सेंटर सुरु करण्याचा विचार-प्रातांधिकारी शमा पवार

 अकलुजमध्ये 300 बेडचे केअर सेंटर सुरु करण्याचा विचार-प्रातांधिकारी शमा पवार


अकलुज (कटूसत्य वृत्त):- कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भविष्यात केअर सेंटरची गरज पडु शकते.त्यासाठी अकलुज येथील पर्यटन महामंडळाच्या पर्यटक निवासात 300 बेडचे केअर सेंटर सुरु करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याचे प्रांताधिकारी शमा पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
सध्याच्या लॉकडाऊन विरोधात अकलुजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील व जि.प.सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शखाली व्यापार्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना दिले.त्यानंतर प्रांताधिकारी शमा पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी म्हणाल्या,अकलुज येथील व्यापार्यांनी पाडवा सणाच्या मुहुर्तावर पुर्ण लॉकडाऊन म्हणजे मोठे आर्थिक नुकसान होवुन व्यापारी वर्गाला आर्थिक फटका बसणार आहे. व्यापार्यांनी सर्वांचे टेस्टींग आणि पात्र कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घेण्याचे अश्वासनही निवेदनामध्ये दिले आहे.त्याच प्रमाणे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करु.दुकानातुन कोणालाही कोरोना संसर्ग होईल किंवा त्याचा प्रसार होईल असे कृत्य होणार नाही अशी ग्वाहीही आपल्या लेखी निवेदनात दिली आहे.
प्रांताधिकारी पुढे म्हणाल्या सर्वच स्तरातील संघटना ,व्यक्तीगत पातळीवरील नागरीकांचे प्रशासनाला नेहमीच सहकार्य लाभले आहे.पण यावेळी व्यापारी वर्गाच्या भावना थोड्या जास्त तीव्र जाणवल्या.लॉकडाऊन संदर्भातील आदेश हा राज्य शासनाचा आहे.त्यामुळे सदरचे निवेदन शासनाकडे पाठवुन व्यापारी वर्गाच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचे अश्वासन यावेळी प्रांताधिकारी शमा पवार यांनी व्यापार्यांना दिल्याचे सांगितले.
तसेच सध्या कोरोनाने परीस्थीती गंभिर होत चालली आहे.सध्या तालुक्यात ९१ सक्रीय रुग्ण आहे.कोरोना रुग्णांच्या बेडची अतिशय बिकट परीस्थीती निर्माण झाली आहे.बेड अॉक्सीजन व व्हेंटीलेटर बेड शिल्लक नाहीत.त्यामुळे नागरीकांनी नियमांचे पालन करुन कोरोना पासुन स्वःताचा व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे.
महाळुंग येथे सेंटरमध्ये असलेल्या 200 बेडची मर्यादा वाढवुन 327 केली आहे.तर माळशिरस येथे 10 अॉक्सीजन आणि10 आयसेल्युशन बेड उपलब्ध आहेत.सध्याची परीस्थीती पाहाता बेडचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होवु शकतो.भविष्या गंभिर परीस्थीती उद्भवु नये म्हणुन पहिल्या लाटेत अकलुज येथील खाजगी डॉक्टरांनी चालु केलेल्या कोवीड हाॉस्पिटलमध्ये 300 बेडचे कोवीड केअर सेंटर चालु करता येवु शकते.त्यासाठी प्रशासनही प्रयत्न करत असल्याचे प्रांताधिकारी शमा पवार यांनी सांगितले .यावेळी तहशिलदार जगदिश निंबाळकर ,नायब तहशिलदार तुषार देशमुख उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages