Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या बेफिकीर अधिकाऱ्यांमुळे झाडांची लागली वाट.

 सांगोला येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या बेफिकीर अधिकाऱ्यांमुळे झाडांची लागली वाट


                        

वनीकरण विभागात वनमजुरांच्या हाताला मिळेना काम.साहेब मात्र यांत्रिक कामावरच आहेत ठाम


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुका आणि ग्रामिण भागात सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या दोन वर्षांपूर्वी लावलेली झाडे करपून गेली आहेत. केवळ कागदोपञी वृक्ष लागवडीचे फुगलेले आकडे दाखवून  जनतेसह शासनाच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक केली असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटना करणार येत्या काळात करणार आहेत.सांगोला तालुक्यातील सामाजिक वनीकरण निद्रावस्थेत असल्याचे सोंग घेत असून,झाडांना पाणी पुरवठा करण्याचे ठेकेदार,वनीकरण विभागात पूर्व पावसाळी हंगामातील कामामध्ये लाखोंचा घोटाळा झाले असल्याची चर्चा सांगोला शहर आणि तालुक्यात आहे.कोणत्याही कामाची इ निविदा न काढता या कार्यालयातील अधिकारी आणि वनपाल मात्र कामे मॅनेज करून त्याच त्या ठेकेदारांना देत असल्याचा आरोप ही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या या कार्यालयात दिवसा एक वनमजुर सोडला तर कोणीच नसते,मात्र संध्याकाळी अधिकारी आणि वनपाल मात्र टिच्चून उपस्थित राहून "दिवसाचा कार्यभार रात्री उरकत असल्याचे"निदर्शनास आले आहे.
     महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने दोन वर्षांपूर्वी पन्नास कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सामाजिक वनीकरण विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट बहाल केले होते.सांगोला तालुक्यातील वेगवेगळ्या  ठिकाणी लावलेल्या वृक्षांची सामाजिक वनीकरण च्याअधिकाऱ्यांनी केवळ वृक्ष   लागवड करण्या पलीकडे काहीही न केल्याचे दिसुन येते, हरितक्रांतीच्या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.सांगोला तालुक्यात लावण्यात आलेल्या वृक्षांना वेळोवेळी पाणी देणे,खत देणे, कुंपण करणे,  ईत्यादी बाबी केवळ कागदावरच राबवण्यात येत आसल्याने सामाजिक वनीकरण विभागाची वृक्षलागवड ही शासनाच्या डोळ्यात शुद्ध धूळफेक असल्याचे ही अनेकांनी सांगितले आहे.यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार? असा ही प्रश्न वृक्ष प्रेमींना पडलेला आहे.
             तालुक्यात आज घडीला काही ठिकाणी लावलेली रोपे दिसेनाशी झाली आहेत. तरी सुद्धा सामाजिक वनीकरण सांगोला येथील अधिकारी व वनपाल हे उंटावरून शेळ्या हाकत असून केवळ वृक्ष लागवडीचा देखावा निर्माण करण्याचे काम ह्या तालुक्यात होत आहे. ३१ मार्चच्या पूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडून पूर्व पावसाळी कामे,आणि रोपवाटीकेत नवीन रोपांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट दिले आहे, मात्र या कामाचा गाजावाजा न करता, ऐन कोरोनाच्या काळात मजुरांच्या हाताला काम न देता,या कार्यालयातील अधिकारी आणि वनपाल यांनी जेसीबी च्या साहाय्याने  कामे करून या कामाची बिले काढून स्वतःची आर्थिक पोळी भाजून घेतल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात या विभागातील सर्व कामाची,लावलेल्या रोपांची, आणि काढलेल्या बिलाची तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments