Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या आवाहनाला प्रतीसाद ३२६ व्यापाऱ्यांनी केली कोरोना चाचणी यात १३ जण कोरो ना बाधित निघाले

 शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या आवाहनाला प्रतीसाद          
 ३२६ व्यापाऱ्यांनी केली कोरोना चाचणी यात १३ जण कोरो ना बाधित निघाले


अकलुज (कटूसत्य वृत्त):- जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कोरोना तपासणी मोहिमेत अकलुजमधील ३२६ नागरीकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात १३ जण कोरोनाचीबाधित निघाले आहेत. 
आज जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने ग्रामपंचायत अकलुज व माळीनगर प्राथमिक आरोग्य केद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अकलुजमधील जुने बसस्थानक,नविन बाजारतळ,विजयसिंह मोहिते-पाटील क्रिडा संकुल व गणेशनगर येथे कोव्हिड १९ ची विशेष तपासणी मोहीमचे अयोजन करण्यात आले होते.या मोहिमेत जेष्ठ नागरिक,  भाजी विक्रेते,छोटे व्यवसायिक,किराणा व्यापारी यांची तपासणी करण्यात आली.यामधे रॅपीड अॅटीजेन २२१ तर आर.टी.पी.सी.आर.१०५ अशी एकुण २२६ जणांची  टेस्ट घेण्यात आली.त्यामधे १३ नागरीक कोरोनाबाधित  सापडले.त्यातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.दोघांना कोव्हीड सेंटरमधे दाखल करण्यात येवुन उर्वरीत नऊ जणांना घरी विलगीकरण करुन ठेवले आहे.या विशेष मोहीमेप्रसंगी जि.प.सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.रामचंद्र मोहिते यांनी भेट दिली असुन या मोहिमेत डाॅ. संकल्प जाधव,दादासाहेब फुंदे,अर्जुन रुपनवर,खाजगी प्रयोग शाळेचे तज्ञ संजय इंगळे व त्यांचे सहकारी,आशा वर्कर्स,आंगणवाडी सेविका,जि.प.शिक्षक,ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य सेवकसेविका व आरोग्य सहाय्यक यांचे सहकार्य लाभले.
दोन दिवसापुर्वी उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी ऑनलाईन व्दारे अकलुजमधील व्यापा-यांशी संपर्क साधून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखन्यासाठी व्यापा-यांनी मास्क लावणे,सोशल डिस्टंस पाळणे व सॅनिटायझर करणे या त्रिसुत्रीचा उपाय करुन लसीकरण करावे तसेच कर्मचारी व ग्राहकांना त्रिसुत्री उपाय करण्यासाठी भाग पाडावे असे अवाहन केले होते.


Reactions

Post a Comment

0 Comments