Hot Posts

6/recent/ticker-posts

शैला गोडसे यांची लिंक रोड परिसरातून भव्य रँली

 शैला गोडसे यांची लिंक रोड परिसरातून भव्य रँली


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकतील महिला उमेदवार शैलाताई गोडसे यांची आज कोर्टी रोड वरील  शहनाई गार्डन ,प्रशांत परिचारक, नगर ,सावरकर नगर ,कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील नगर, तसेच वसंतराव काळे नगर लिंक रोड मार्गे नागालँड ची पिछाडी बाजू समता नगर ,वांगीकर नगर बालाजी नगर, शिव पर्वती नगर, तसेच कंडरे 
फिटनेस पर्यंत भव्य प्रचार रॅली आज रोजी शैलाताई गोडसे यांनी या भागांमधून पायी चालत आपला प्रचार दौरा पूर्ण केला. त्यांनी आपण या विधानसभा निवडणुकीला पंढरपूर शहरातील तसेच तालुक्यातील, मंगळवेढा शहर व तालुक्यातील विविध विकास कामे, रस्ते ,पाणीप्रश्न बेरोजगारांचे प्रश्न ,तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांचे थकित ऊस बिल मिळवून देण्यासाठी तसेच तिर्थक्षेत्र म्हणून पंढरपूर मंगळवेढा या शहराची शासनाने खास नोंद घेतलेली आहे .या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला एक वेळ विधानसभेमध्ये जाण्याची संधी मतदार बंधू-भगिनींना द्यावी. अशी विनम्र विनंती शैलाताई गोडसे या परिसरातील मतदार बंधू-भगिनींना हे करीत आपला प्रचार दौरा पूर्ण केला. या उपनगरातील मतदार बंधू-भगिनींनी शैलाताई गोडसे यांना महिला उमेदवार म्हणून महिला वर्गाने प्रचंड प्रतिसाद देत महिलांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी एक महिला उमेदवारच आवश्यक आहे. त्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महिलांचा, दीन दलितांचा, कष्टकरी ,शेतकरी यांचा उद्धार करण्यासाठी शैलाताई गोडसे या विधानसभेमध्ये जाणे जरुरीचे आहे. असे मत या परिसरातील कित्येक महिला मतदारांनी आपले मत व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments