पार्क स्टेडियम येथील थकीत गाळे धारकांची दुकानं महापालिकेने केले सील
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- पार्क स्टेडियम येथील 59 गाळेधारकांनी महानगरपालिकेनं बजावलेल्या भाडेवाढीच्या नोटिशीचा निषेध करत आजपासून दुकानं बंद ठेवली आहेत. जोपर्यंत भाडेवाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत गाळे, दुकाने बंद असेल असं पार्क स्टेडियम शोरूम असोसिएशनच्या पत्रकार परिषदेत आज सांगण्यात आलं. यावेळी स्टेडियम चे पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते. महापालिकेने शनिवारी या सर्व गाळेधारकांना शासनाच्या आणि महापालिकेच्या निर्णयानुसार भाडेवाढीच्या नोटिसा बजावल्या आहेत ही भाडेवाढ मान्य करून भाडे आदा न केल्यास दुकानं मालमत्तेसह सील केली जातील असेही नोटीसमध्ये म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत उमेश ऐनापुरे, सतीश बिद्री, किरण यज्जा, केतन शहा उपस्थित होते.
दरम्यान आज सोलापूर महापालिकेने पार्क स्टेडियममधील गाळ्यांना सील केले आहेत.याठिकाणी वर्षानुवर्ष महापालिका कवडीमोड भाडे आकारत होते. गाळेधारकांनी मनमानी पद्धतीने अतिक्रमण केलं आहे. गाळेधारकांनी आज दुकाने बंद ठेवल्याने महानगरपालिकेला गाळे सील करण्याची आयती संधी मिळाली आहे, त्यानुसार सध्या गाळे सील करण्यात आले.
0 Comments