Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ शहराच्या दक्षिण भागातून नव्या राजकीय युवा नेतृत्वाची एन्ट्री

 मोहोळ शहराच्या दक्षिण भागातून नव्या राजकीय युवा नेतृत्वाची एन्ट्री

प्रभाग पंधरा मधून राष्ट्रवादीकडून समीर नाईकवाडी यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत
राष्ट्रवादीकडे केली रितसर उमेदवारीची मागणी

                                         

मोहोळ  (कटुसत्य वृत्त )  :-  गत नगर परिषदेच्या निवडणुकीत अल्पमतांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातून शिवसेनेला गेलेल्या प्रभाग 15 मध्ये निवडणुकपूर्व हालचालींना वेग आला आहे. यावेळी गतवेळच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पडद्याआड पक्षिय व्युव्हरचनेला प्रारंभ केल्याचे जाणवत आहे. सध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या बहुतांश प्रभागांमध्ये नव्या आणि सुशिक्षित युवा चेहऱ्यांना संधी देऊन निवडणुकीत चांगले आव्हान देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात आहे. यामुळेच प्रभाग 15 मधून समीर नाईकवाडी या युवा नेत्याच्या राजकीय कारकीर्दीची एंट्री झाली आहे.गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग 15 मध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नाईकवाडी परिवारातील सुपुत्र आणि मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील ज्येष्ठ मार्गदर्शक राजू नाईकवाडी यांचे सुपुत्र समीर नाईकवाडी यांचे नाव पुढे आले आहे.
उदयोन्मुख युवानेते समीर नाईकवाडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आ. राजन पाटील युवानेते अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडे रीतसर पक्षाच्या उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक पंधरा मधून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी आपला अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. या प्रभागातून राष्ट्रवादीकडून जरी अनेक जण इच्छुक असले तरी एक सुशिक्षित युवा आणि नवा चेहरा म्हणून समीर नाईकवाडी सरस मानले जात आहेत. त्यामुळे प्रभाग 15 मधील उमेदवारीचे युवा नेते समीर नाईकवाडी हे दावेदार मानले जात आहेत. समीर नाईकवाडी यांचे कुशल संघटन कौशल्य आणि प्रभागात यापुर्वी त्यांनी केलेले सामाजिक कार्यामुळे समीर नाईकवाडी यांना निश्‍चितपणे निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या गोटातून नाईकवाडी यांची उमेदवारी सध्या निश्चित मानली जात आहे.
मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थपणे पेलत आहे. माजी आ. राजन पाटील, आमदार यशवंत तात्या माने यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनस्तरावरून मिळवून देऊन मोहोळ शहराच्या कानाकोपऱ्यातील रस्ते पाणी आरोग्य या समस्या सक्षमपणे सोडवल्या आहेत.गेल्या अनेक वर्षापासून आमचा परिवार सामाजिक कार्यात सहभागी आहे. या पुढील काळात प्रभागातील अडीअडचणी सोडवण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून मी प्रयत्नशील रहावे अशी माझ्या सर्व सहकारी मित्रांची आणि आमच्या परिवारावर प्रेम प्रभागातील नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक लढविण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत तात्या माने या ज्येष्ठ नेत्यांनी मला संधी दिल्यास नक्कीच ही निवडणूक जिंकून प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
समीर राजू नाईकवाडी
युवा नेते राष्ट्रवादी           



Reactions

Post a Comment

0 Comments