शेतकऱ्यांना 'इस्टंट मनी' ची सवय लावणारे साखर कारखाने जिवंत ठेवण्यात 'धनश्री' चा मोठा वाटा
माजी आमदार धनाजी साठे यांचे प्रतिपादन
सौंदणे (कटुसत्य वृत्त ) :- सोलापूर जिल्ह्यातील अनेक सहकारी व खाजगी साखर कारखाने हे सध्या आर्थिक संकटाशी सामना करीत आहेत. अशा साखर कारखान्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम 'धनश्री' च्या माध्यमातून प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी पार पाडले आहे असे प्रतिपादन कुर्मदास सहकारी कारखान्याचे चेअरमन धनाजी साठे यांनी केले आहे.
धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. ७ मार्च रोजी सकाळी १० वा. पंढरपूर रोड, एम.एस. ई. बी जवळ मंगळवेढा येथे रेवनिल ब्लड बँक सांगोला यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी आ. धनाजी साठे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी या होत्या. व्यासपीठावर प्रा. शिवाजीराव काळुंगे, मंगळवेढा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, कुरुलचे प्रा. माऊली जाधव, उद्योजक नागेश फाटे, प्रा. शोभा काळुंगे, दिगंबर भगरे, प्रभाकर कलूबर्मे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना धनाजी साठे म्हणाले कि ज्या साखर उद्योगाने शेतकऱ्याला ‘इन्स्टंट मनी’ची सवय लावली, तो साखर उद्योग आता अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक केंद्रबिंदु असलेले साखर कारखाने सहकारी चळवळीच्या माध्यमातून जिवंत ठेवण्यात प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभा काळुंगे यांचे मोठे योगदान आहे. खऱ्या अर्थाने शेतकरी सुखीसंपन्न व्हावा यासाठी आर्थिक संस्था उभा करण्याचा काळुंगे दाम्पत्य व त्यांच्या संचालक मंडळांचा हेतू नक्कीच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढत त्यांनी प्रा.शिवाजीराव काळुंगे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना नंदकुमार शिंदे म्हणाले कि सध्याच्या कोरोना संकटात रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.असे रक्तदान शिबिरासारखे उपक्रम समाजाच्या हिताचे असतात. असे सामाजिक हित जोपासण्यास प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री परिवार हा सदैव अग्रेसर असतो. जगात रक्त हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वांनी रक्तदान करून गरजू लोकांना जीवनदान देण्याचे आपल्या जीवनातील महत्वाचे कार्य पार पाडावे असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
यानंतर आपले मनोगत मांडताना नगराध्यक्षा अरुणा माळी म्हणाल्या,धनश्री परिवाराच्या माध्यमातून 'सहकारातून महिला सक्षमीकरण' हे समीकरण जुळवुन आणण्याचे काम प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभा काळुंगे यांनी केले आहे.
महिला सशक्तीकरण, सबलीकरण सातत्याने कानावर पडणारे सवयीचे झालेले शब्द आहेत. सतत ऐकून त्यांचे फारसे महत्त्व वाटत नसले तरी एकूण समाज विकासासाठी या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत.विविध क्षेत्रात महिलांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच होती. बाकी सर्वसामान्य महिला प्रवाहापासून दूरच होत्या. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सहकार चळवळीमुळे साध्य होतांना दिसत आहे. महिलांच्या विविध संस्था, बचतगट या माध्यमातून महिला विकासाला एक नवीन दिशा मिळाली आहे. स्वत: ची बचत करुन त्यातून बँका, पतसंस्थांच्या मदतीने कर्ज घेऊन स्वत: चा व्यवसाय सुरू करुन इतर महिलांच्या मदतीने तो वाढवून आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचावणे अशा अनेक गोष्टी या बचतगटांच्या माध्यमातून होवू शकतात. आर्थिक स्वावलंबन ही महत्त्वाची गोष्ट या गटांच्या माध्यमातून महिलांना मिळाली. प्रत्येक सहकारी संस्थेत दोन महिला संचालक असल्याच पाहिजेत, असा नियम करण्यात आलेला आहे. त्यांचा योग्य उपयोग करुन प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभा काळुंगे यांनी धनश्री महिला पतसंस्था ही स्वतंत्र महिलांसाठी सहकारी संस्था उभारुन महिला सशक्तीकरणाचे काम जोमाने वाढू शकते याचे जिवंत उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे.असे सांगत प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रा.शोभा काळुंगे, कुरुलचे प्रा. माऊली जाधव व उद्योजक नागेश फाटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक बबनराव आवताडे, माजी सभापती भुजंगराव पाटील, दामाजी शुगरचे चेअरमन समाधान आवताडे, माजी जि. प. सदस्य व्यंकट भालके, न.पा. पक्षनेते अजित जगताप, युन्नूस शेख, मल्टिस्टेटच्या संचालिका डॉ. राजलक्ष्मी काळुंगे - गायकवाड, दीपाली काळुंगे - पाटील, उद्योजक प्रकाश काळुंगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, राष्ट्रवादीचे लतीफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष बाबुभाई मकानदार, प्रमोद साळुंखे, सुहास पंडित, दामाजी शुगरचे माजी संचालक हर्षराज बिले, पांडुरंग भाकरे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर, पं. स. सदस्य ईश्वर गडदे, सोमन्ना संगोलकर, माजी उपसभापती रमेश भांजे, बसवराज पाटील, तानाजी काकडे, धनश्री मल्टिस्टेट व्हा. चेअरमन युवराज गडदे, संचालक रामचंद्र बंडगर, अविनाश मोरे, रावसाहेब फटे, सांगोला न. पा. नगरसेवक सोमेश यावलकर, सिद्धेश्वर पाटील, सिद्धेश्वर जाधव, दादासाहेब इंगोले, लहू ढगे, सुयोग गायकवाड, सुभाष ढेकळे, सोमनाथ गुळमिरे, शशिकांत केदार, सागर कापले, उत्तम पाटील, सतीश दत्तु, आंधळगावचे माजी उपसरपंच दिगंबर भाकरे, निंबोणीचे माजी सरपंच अर्जुन खांडेकर, सोमनाथ बुरजे, धनश्री पतसंसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनीता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे , उद्योजक गंगाराम खांडेकर, सारंग पुजारी, राहुल खांडेकर, दिलीप वेळापुरे, कबीर शेख, राजू चव्हाण, निलेश आवताडे, संजय चव्हाण यांचेसह इतर
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दिवसभर त्यांच्या जीवनसाथी या निवासस्थानी उपस्थित राहून प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा ७२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षांव केला.
याप्रसंगी सुमारे जवळपास १७२ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळी धनश्री परिवाराच्यावतीने प्रत्येक रक्तदात्यांना टी शर्ट भेट देण्यात आला. रक्तदानाचा हा कार्यक्रम सरकारने अटी घालून दिलेल्या कोविड नियमांचे पालन करून व्यवस्थितरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कल्याणी कोळी यांनी केले.
0 Comments